मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत

By admin | Published: March 27, 2017 06:13 AM2017-03-27T06:13:01+5:302017-03-27T06:13:01+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील ३६ गावातील काही सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन एका सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे

Financial aid to dead relatives | मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत

मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत

Next

म्हसळा : श्रीवर्धन तालुक्यातील ३६ गावातील काही सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन एका सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या संघटनेच्या माध्यमातून मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत देण्यात आली.
म्हसळा तालुक्यात नुकत्याच दोन अतिशय दुर्दैवी दु:खद घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये ग्रामपंचायत ठाकरोली माजी सरपंच तथा गावचे अध्यक्ष धोंडू कापडी यांचे १५ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी आर्थिक मदत पाच हजार रुपयांची त्यांच्या कुटुंबीयांकडे २४ मार्च रोजी संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी सुपूर्द केली. तसेच तोंडसुरे गावचे तरुण सामाजिक कार्यकर्ते शांताराम शिगवण यांचे २४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी पाच हजार रुपये मदत घरी जाऊन कुटुंबीयांकडे संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही संघटना स्थापन करण्यासाठी म्हसळा तालुक्यातील ठाकरोळी गावचे सामाजिक कार्यकर्ते संस्थापक महेंद्र जाधव यांनी पुढाकार घेऊन १६ संघ आझाद सामाजिक संघटना म्हसळा-श्रीवर्धन या नावाने संघटना स्थापन केली आहे. ही संघटना सामाजिक, शैक्षणिक वस्तूंचे वाटप करणे, तालुक्यात आकस्मिक दुर्दैवी घटना, गरीब गरजूंना आर्थिक निधी देणे, अशा विविध समाजोपयोगी व लोकहिताची कामे संघटनेच्या माध्यमातून येथील तरुण करत आहेत. (वार्ताहर)
१६ संघ आझाद सामाजिक संघटना क्रि केटच्या माध्यमातून सामाजिक कामे करत असून ३६ गावचे तरु ण या संघटनेत कार्यरत असल्याचे संस्थापक महेंद्र जाधव यांनी सांगितले.

Web Title: Financial aid to dead relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.