दासगाव/बिरवाडी : महाडमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपात शिवसेनेला लक्ष करत टीका केली या टीकेला शिवसेनेच्या युवा सेनेचे दक्षिण रायगड अधिकारी विकास गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले. महाड मतदार संघात शिवसेनेला संपवण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. तर राष्ट्रवादी या ठिकाणी काँग्रेसबरोबर ठामपणे असेल असे सांगितले जात असले तरी कार्यकर्ते मात्र त्या मानसिकतेत नसल्यानेच दिसून येत असल्याचे भरत गोगावले म्हणाले.महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता झाली. यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि काँग्रेस उमेदवारांनी जोरदार टीका केली. याला प्रत्यत्तर देण्यासाठी युवा सेनेचे अधिकारी विकास गोगावले यांनी पत्रकार परिषद घेतली. महाड मध्ये शिवसेना संपविण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादीला सात जन्म घ्यावे लागतील. ज्या महाड मध्ये ग्रामीण भागाचा विकास केला नाही, असे सांगितले जाते. त्याच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात देण्यासाठी ग्रामीण जनता वेडी नाही. टीका करण्याआधी विरोधकांनी ग्रामीण भागात जावून बघा असा सल्लादेखील दिला.छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत आमदार भरतशेठ गोगावले यांची श्रद्धा काय आहे ते सांगण्याची गरज नाही असे रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे म्हणाले. यावेळी विकास गोगावले, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, महाड नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते दीपक सावंत, सिद्धेश पाटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.विकास काय हे समजलेचंद्रकांत कळंबे यांनीदेखील महाड, पोलादपूर आणि माणगाव मध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिल, असा विश्वास व्यक्त करून स्थानिक स्वराज्य संस्था कायम सेनेकडे देते याचा अर्थ महाड पोलादपूरमधील जनता भूलथापांना बळी पडत नाही. विकास म्हणजे काय हे त्यांना यांच्यापेक्षा चांगले कळले आहे, असेही स्पष्ट केले.
'महाडमधून शिवसेनेला संपविण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:48 PM