उरणमधील अमेया यार्डमध्ये आग; कोट्यावधी किमतीचा कलमार जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 07:15 PM2022-09-29T19:15:04+5:302022-09-29T19:15:12+5:30

जेएनपीए बंदरातून देश परदेशात आयात-निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक अमेया यार्डमध्ये केली जाते.

Fire at Ameya Yard in Uran; Kalmar worth crores burnt | उरणमधील अमेया यार्डमध्ये आग; कोट्यावधी किमतीचा कलमार जळून खाक

उरणमधील अमेया यार्डमध्ये आग; कोट्यावधी किमतीचा कलमार जळून खाक

googlenewsNext

- मधुकर ठाकूर 

उरण : उरण तालुक्यातील बांधपाडा( खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या अमेया यार्डमधील कलमारला आग लागण्याची घटना गुरुवारी ( २९ )  घडली आहे.या आगीत कोट्यावधी किमतीचा  कलमार जळून खाक झाला आहे.

जेएनपीए बंदरातून देश परदेशात आयात-निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक अमेया यार्डमध्ये केली जाते. मालानी भरलेला कंटेनर हा ट्रेलरवर ठेवण्याचे काम हे यार्ड मधील कलमार हे करत असतात.काम सुरू असतानाच अशा या कलमारला शाँटसर्किटमुळे आग लागण्याची घटना गुरुवारी घडली. मात्र आग विझविण्यात दिरंगाई झाल्याने आगीत कोट्यावधी रुपये किमतीचा कलमार भस्मसात झाला आहे.या आगीनंतर अग्निशमन यंत्रणेच्या अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.

Web Title: Fire at Ameya Yard in Uran; Kalmar worth crores burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.