Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रकल्पात भीषण आग, चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 08:22 AM2019-09-03T08:22:24+5:302019-09-03T11:27:31+5:30
Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ही भीषण आग लागली असून या आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधे अग्निशमन दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लिक्विड लिकेजमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra: Fire breaks out at a cold storage at Oil and Natural Gas Corporation (ONGC) plant in Uran, Navi Mumbai. Fire tenders have reached the spot. pic.twitter.com/V2HSCt58nJ
— ANI (@ANI) September 3, 2019
याआधी सोमवारी रात्री (2 सप्टेंबर) भेंडखळ-उरण येथील बामर लॉरी गोदामातील भरलेल्या कंटेनरमधील कपड्याला अचानक आग लागली होती. या आगीत कंटेनरमधील माल जळून खाक होऊन लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
ONGC: A fire broke out in storm water drainage, today morning in Uran oil & gas processing plant. ONGC fire services & crisis management team immediately pressed into action. Fire is being contained. No impact on Oil processing. Gas diverted to Hazira Plant. #Maharashtrahttps://t.co/co3OoHhOjP
— ANI (@ANI) September 3, 2019