इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:02 AM2023-07-20T09:02:07+5:302023-07-20T09:02:59+5:30

दुर्घटनेत बचाव कार्यासाठी जात असलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

fire fighter died due to suffocation during rescue opreation, Irshalwadi Landslide Incident Raigad | इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

इर्शाळवाडी : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दुर्घटनेत बचाव कार्यासाठी जात असलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यु करण्यासाठी जात असताना नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी येथील अग्निशमन दलाचे सहायक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. इर्शाळवाडीत जाण्यासाठी कठीण मार्ग असल्याने रक्तदाब वाढून शिवराम ढुमणेसोबत ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाचे पथक व स्वच्छता विभागाचे कर्मचारी घटनास्थळी मदतकार्य करत आहेत.

याचबरोबर, इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावासाठी एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे इर्शाळगडाच्या पायथ्याशी जाण्याचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले होते. 

२७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश 
या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

Web Title: fire fighter died due to suffocation during rescue opreation, Irshalwadi Landslide Incident Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.