कर्जत विश्रामगृह परिसरात आग
By admin | Published: March 27, 2017 06:26 AM2017-03-27T06:26:41+5:302017-03-27T06:26:41+5:30
कर्जत शहरात गुलमोहर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह आहे. या परिसरातील लाकडांना शनिवारी भीषण आग
नेरळ : कर्जत शहरात गुलमोहर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह आहे. या परिसरातील लाकडांना शनिवारी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी लाखो रु पयांचे लाकडांचे ओंडके जळून खाक झाले आहेत.
कर्जत शहरातून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हास नदीच्या काठावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे गुलमोहर नावाचे विश्रामगृह आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करताना, तोडलेल्या वृक्षांचे शेकडो ओंडके विश्रामगृहाच्या परिसराच्या आवारात रचून ठेवले होते. या ओंडक्यांना शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास आग लागली. (वार्ताहर)
आग विझविण्यासाठी खोपोलीहून अग्निशमन बंब बोलविण्यात आले होते. याच आग पसरलेल्या जागेत विजेचा खांब, तारा असल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. लगेचच येथील वीजप्रवाह खंडित करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनास्थळा पासून २० फूट अंतरावर विश्रामगृह आहे.