नेरळ-माथेरान घाटात वणवा, टेकडीवरील १५ किमी जंगल खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 02:27 AM2019-05-05T02:27:49+5:302019-05-05T02:28:36+5:30
गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान १५ कि.मी. परिसरातील जंगल खाक झाले.
नेरळ - गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान १५ कि.मी. परिसरातील जंगल खाक झाले. नेरळ वनविभागाचे कर्मचारी पहाटे ५ पर्यंत आग विझवत होते. जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी कर्जत नगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती.
नेरळ येथून माथेरानकडे जाणाऱ्या रस्त्यावर नांगरखिंड येथे शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वणवा लागला. कर्जत येथील अग्निशमन यंत्रणेने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु टेकडीच्या वरच्या भागात यंत्रणा पोहोचू न शकल्याने आग विझविण्यात विलंब लागला. कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी मध्यरात्री १२ च्या सुमारास नेरळ-माथेरान घाटात येऊन वणव्याची पाहणी केली. वणव्याची तीव्रता अधिक असल्याने तब्बल दहा तासांनी तो क्षमला. एकाच वेळी तीन ठिकाणी वणवा लागल्याने तो मानवनिर्मित असल्याचा संशय या वेळी व्यक्त करण्यात आला. वणव्यामुळे नेरळ-माथेरान घाटातील टेकडीवरील १५ कि.मी.चा परिसर आगीत खाक झाला.
नैसर्गिक संपदेचा ºहास
एका वेळी तीन ठिकाणी वणवा लागल्याने कोणतरी जाणूनबुजून आग लावल्याचा संशय परिसरातील नागरिकांनी या वेळी व्यक्त केला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. वणवा रोखण्यासाठी तीन टीम तयार केल्या आणि वणवा विझविण्यास सुरु वात केली.
सायंकाळनंतर वारा सुटल्याने आग झपाट्याने पसरल्याची माहिती वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांनी यावेळी दिली. रायगड जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्यात आले. मात्र याठिकाणी वणवा लागण्याचे प्रकारही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. वाढते तापमाना बरोबरच मानवनिर्मिती वणव्यांमुळे नैसर्गिक संपदेचा मोठ्या प्रमाणात ºहास होत आहे.