थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:43 PM2019-05-22T23:43:05+5:302019-05-22T23:43:07+5:30

जीवितहानी नाही : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण

Fire at Sub Station in RCF Company area of Thal | थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग

थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग

Next

अलिबाग : थळ येथील खतनिर्मिती करण्यात अग्रेसर असणाऱ्या आरसीएफ कंपनीच्या क्षेत्रातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या १०० केव्हीच्या उपकेंद्राला मंगळवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आरसीएफच्या अग्निशमन यंत्रणेने ती तत्काळ विझवल्याने मोठा अनर्थ टळला. शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तेथील केबलसह अन्य साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याच कारणामुळे अलिबाग तालुक्यातील वीजपुरवठा २१ मे आणि २२ मे रोजी खंडित झाला होता. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने दुसºया फिडरवरून विद्युत प्रवाह सुरू केल्याने २१ मे रोजी रात्री वीजप्रवाह तब्बल दीड तासांनी परत सुरू झाला होता.


महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बुधवारी दिवसभर फॉल्ट शोधत होते. मात्र, त्यांना तो सापडत नव्हता. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली व्हॅन अलिबागमध्ये दाखल झाल्यावर तिच्या माध्यमातून नेमका कोणता आणि कोठे फॉल्ट झाला होता याची माहिती मिळाली. त्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यासाठी वीजप्रवाह पुन्हा दीड तासांसाठी खंडित करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील थळ परिसरामध्ये आरसीएफचा खतनिर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारी वीज महाराष्ट्र वीज कंपनीला देण्यात येते. यासाठी आरसीएफ प्रकल्पाच्या परिसरातच वीज कंपनीचे १०० केव्हीचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. आरसीएफ प्रकल्पातून तयार होणारी वीज या १०० केव्हीच्या सबस्टेशनच्या माध्यमातून वीज कंपनी अलिबागमध्ये पुरवठा करते. मंगळवारी याच सबस्टेशनला सायंकाळी शार्टसर्किटमुळे अचानक आग लागली होती. आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेने ती तातडीने विझवली. सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अलिबाग येथील उपअभियंता पंकज जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


बुधवारी सायंकाळी फॉल्ट सापडल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी ४.४५ वाजता विद्युत प्रवाह पुन्हा खंडित करण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर सुमारे दीड तासानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मंगळवारी विद्युत पुरवठा १ ते ५ असा सलग खंडित झाला
होता.


व्यावसायिकांना फटका
कडक उन्हाचे चटके बसत असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर पुन्हा विजेचा लंपडाव सुरूच असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. मंगळवारी दुपारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विविध व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. बुधवारी दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांना पुन्हा फटका बसल्याने वीज कंपनीबाबत नाराजी दिसून आली.


विद्युत पुरवठा खंडित
च्कार्लेखिंड : सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे रेवस फिडरच्या हद्दीतील नागरिक हैराण झाले आहेत. रेवस फिडरच्या अखत्यारित मोठा विभाग असल्यामुळे जास्त अडचणी होत आहेत. दररोज काही ना काही तरी तांत्रिक बिघाड होत आहे.
च्मे महिन्यातील उन्हाळा आणि त्यात वाढलेली उष्णता यामुळे घरात पंखा किंवा एसी लावल्याशिवाय माणसाला दिलासा मिळत नाही; परंतु या फिडरमधील वीजपुरवठा नेहमीच खंडित होत असतो कारण या विभागातील उच्चदाब वाहिनी ही जंगलातून तसेच झाडांमधून नेलेली आहे.
च्दुसरे म्हणजे जीर्ण विद्युत तारा तर कर्मचारी आणि अभियंता यांचा तुटवडा या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार विद्युत मंडळाने जमिनीखालून विद्युत वाहिन्या टाकून ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
च्मंगळवारी सासवणे, आवास, तुडाळ येथे वाहिनी तुटली होती आणि थळ येथे जमिनीतून टाकण्यात आलेली उच्चदाब वाहिनी जळल्याने जवळजवळ सहा ते सात तास तर काही ठिकाणी १४ तास विद्युत पुरवठा खंडित झाला.

Web Title: Fire at Sub Station in RCF Company area of Thal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.