अलिबागमधील फटाक्याच्या गाेडाऊनला आग; आगीत गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 07:15 PM2022-02-12T19:15:32+5:302022-02-12T19:15:37+5:30
अलिबाग-जलपाडा येथे अनंत फायर वर्क्स आहे. फटक्यांचे येथे उत्पादन घेतले जाते.
कार्लेखिंड- अलिबाग तालुक्यातील जलपाडा येथील अनंत फायर वर्क्स या फटाका कारखान्याच्या गोडाऊनला आग दुपारी लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी अलिबाग नगर परिषदेसह आरसीएफ कंपनीचे अग्निशमन दल दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये गा़ेडावूनचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अलिबाग-जलपाडा येथे अनंत फायर वर्क्स आहे. फटक्यांचे येथे उत्पादन घेतले जाते. फटाके तयार करताना त्यामध्ये बेरियम हा घटक वापरण्यात येत असल्याच्या कारणाने दिवाळीमध्ये पाेलिसांनी या कारखान्यावर कारवाई केली हाेती. पाेलिसांनी सदरचा माल जप्त करुन अनंत फायर वर्क्सच्या गाेडाऊनमध्येच ठेवला हाेता, अशी माहिती अनंत फायर वर्क्सचे मालक अनंत शिंदे यांनी लाेकमतला दिली.
आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक गाेडाऊनला आग लागली. त्यामुळे तातडीने अग्नीशमन दलाला बाेलावण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. अलिबाग नगर परिषदेचे दाेन आणि आरसीएफ कंपनीच्या एक अशा तीन अग्नीशमन बंबाने अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कारखाना बंद असल्याने कामगार नव्हते. तसेच गाेडाऊनच्या आसपासही काेणी नसल्याने काेणालाही धाेका पाेचला नाही, मात्र मालासह गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.