पहिल्या श्रावणी सोमवारी भाविक दर्शनाला मुकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:08 AM2020-07-28T00:08:03+5:302020-07-28T00:08:10+5:30

मंदिराच्या बाहेरून घेतले दर्शन : काही भक्तांची घरातूनच आराधना

The first hearing was held on Monday | पहिल्या श्रावणी सोमवारी भाविक दर्शनाला मुकले

पहिल्या श्रावणी सोमवारी भाविक दर्शनाला मुकले

Next

आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्ह्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. पहिल्याच श्रावणी सोमवारी भक्तांना मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले, तर काही भक्तांनी घरातूनच आराधना केली. मंदिर परिसरामध्ये फुले, हार, बेलाची पाने, दूध अशा पूजा साहित्यांची विक्री करणाऱ्या हंगामी व्यावसायिकांचा रोजगार बुडाला आहे.


रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली केलेली नाहीत. मंदिरे, मशिद, चर्च अशा ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता अधिक आहे. या ठिकाणी सामाजिक अंतराचा फज्जा उडण्याची भीती आहे. याच कारणासाठी सरकार आणि प्रशासनाने प्रार्थना स्थळे सर्वांसाठी खुली करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे दरवर्षी मंदिराबाहेर दर्शनासाठी लागणाºया रांगा आज दिसल्या नाहीत.

रायगड जिल्ह्यातील मंदिरांना कु लूप : रायगड जिल्ह्यातील विविध मंदिर परिसरांना श्रावण महिन्यातील दर सोमवारी जत्रेचे स्वरूप येत असते. बेल, फुले, हार, दूध याची विक्री करणारे छोटे व्यावसायिक मंदिराच्या परिसरामध्ये हमखास दिसून येतात. हंगामी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे दिवस सुगीचे ठरतात. काहींचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर असतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांनाच कुलूप असल्याने भाविकच आले नाहीत.

छोट्या व्यावसायिकांना फटका
च्मंदिर परिसरामध्ये छोटे व्यावसायिक बेल, फुले, हार, दूध यांची विक्री करतानाचे चित्रही मंदिर परिसरामध्ये दिसले नाही. त्यामुळे त्या-त्या मंदिर परिसरामधील छोटीशी अर्थव्यवस्था थांबल्याने हंगामी व्यावसायिकांचा रोजगार बुडाला आहे.
च्अलिबाग येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाहेरूनच भाविकांनी शंकराचे दर्शन घेतले. पहिल्यांदाच दर्शनासाठी मुकावे लागल्याचे भाविकांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. सरकारने परवानगी दिली, तरी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात येणार नाही. सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क अशा नियमांकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ नाही. बाहेरून दर्शन घेण्यास कोणतीच हरकत राहणार नाही.
- प्रकाश गुरव, काशी विश्वेश्वर मंदिराचे मालक, अलिबाग

Web Title: The first hearing was held on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.