महाडमध्ये भरली कोकणातील पहिली जल नियोजन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:14 AM2018-10-25T00:14:22+5:302018-10-25T00:14:23+5:30

संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट घोंगावत असताना भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणालाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत

First Water Planning Workshop in Kala Kala, Mahal | महाडमध्ये भरली कोकणातील पहिली जल नियोजन कार्यशाळा

महाडमध्ये भरली कोकणातील पहिली जल नियोजन कार्यशाळा

Next

महाड : संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट घोंगावत असताना भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणालाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत, यासाठी जलनियोजन आणि जलसाक्षरता महत्त्वपूर्ण असल्याने, कोकणातील पहिल्या जलनियोजन अंदाजपत्रक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन बुधवारपासून हिरवळ संस्थेच्या वतीने महाड शहरातील मिलिटरी बोर्डिंगच्या कॅम्पसमध्ये केले आहे.
कोकणात पाऊस चांगला पडत असतानाही पाण्याच्या नियोजनाअभावी दरवर्षी कोकणातील अनेक तालुक्यांत उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसतात, यासाठी ठिकठिकाणी जलदूतांमार्फत जनजागृती पाणी नियोजनात सुसूत्रता होऊन आपला जलनियोजनाचा हेतू सफल होईल, असा विश्वास हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. भविष्यात जलनियोजन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन धारिया यांनी या वेळी केले.
चार दिवस चालणाºया या कार्यशाळेमध्ये यशदा, पुणे, अ‍ॅक्शन आॅन क्लायमेट टुडे., आॅटर या संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पालघर, मोखाडा भागातील जलदूत या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. कोकणातील जमीन, उतार, मातीचा पोत, भौगोलिक परिस्थिती सर्व काही वेगळे आहे, त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राचे निकष लावून कोकणात पाणी नियोजनाबाबत कार्यक्रम राबवले जाऊ नयेत, अशी गरज या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
हिरवळ प्रतिष्ठान या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी विष्णू साळवे, यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंंत पांडे, लघू पाटबंधारे विभागाचे एस. एम. गोडसे, संजय परांजपे, महाड पंचायत समिती सभापती सपना मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: First Water Planning Workshop in Kala Kala, Mahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.