शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

हिराकोटमधील माशांना मिळणार जीवदान

By निखिल म्हात्रे | Published: January 06, 2024 12:46 PM

मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकाऱ्यांनी हिराकोट तलावाची पाहणी केली.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या हिरकोट तलावातील माशांचे संवर्धन केले जाणार आहे. माशांना बाहेरून देण्यात येणारे खाद्य पुर्णपणे थांबविण्यात यावे अशा सुचना मस्त्य विभागाने अलिबाग नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत.दे मत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त संजय पाटील यांनी अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना याबाबतचे पत्रच सादर केले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकाऱ्यांनी हिराकोट तलावाची पाहणी केली असता सदर पाहणी दरम्यान तळयातील पाण्याचे विविध गुणधम पासण्यात आले. तसेच मेलेल्या तिलापिया माश्याचे नमुने घेण्यात आले की, पाण्याचा रंग हा हरवा झालेला असून पाण्यामध्ये वनस्पती प्लवंगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याने पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी झालेले आहे. एकंदरीत पाण्याचा दर्जा बिघडत असल्याचे जाणवते. मरतुक झालेल्या तिलापिया माश्यांना आजार झाल्याचे दिसून आलेले आहेत. तसेच माशांच्या कल्ल्यांचे निरीक्षण केले असता पाण्यामध्ये कमी प्रमाणामध्ये विरघळलेला प्राणवायू असल्याचे जाणवत आहे.

अशी परिस्थिती पाहता, पाण्यामधील प्राणवायूची मागणी कमी करण्यासाठी पाण्यामध्ये असलेलाा मत्स्यसाठा ५०% कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून सद्यस्थितीत पाण्यात असलेला प्राणवायू उर्वरीत माशांना पुरेसा ठरून माशांचे मृत्यू होण्याचे प्रमाण थांबेल असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे. मृत्यूमुखी पडलेले मासे होणारे मासे तात्काळ काढून टाकण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळाची तरतूद केले जावी. जेणेकरून त्यांच्या कुजण्याच्या क्रियेमुळे तलावातील पाणी दर्जाहीन होणार नाही व इतर माशांना होणारा संसर्ग कमी करता येईल. लोक त्यांच्या घरातील शोभेच्या माशांच्या टाक्यांमधील मासे तलावात सोडत असावेत, यास देखिल अटकाव करावा, असेही मत्स्य विभागाच्या पत्रात नमूद केलेले आहे.बाहेरचे खाद्य बंद करा -

माशांना बाहेरून देण्यात येत असलेले खाद्य देणे तात्काळ थांबवावे. पाण्याचा हिरवा रंग जाण्यासाठी तातडीची उपाय म्हणून सकाळी ९ वाजता १०० लीटर ताजे गोडे पाणी एका बॅलरमध्ये (२०० लि.) घ्यावे त्यात १० घस साखर १० घस तांदळाचे पीठ मिस्क करावे. त्यानंतर ३ ते ४ तासोनो काठीने हलवावे.  ४८ तासांनी हे द्रावण तळावात सगळीकडे फिरुन टाकावे. भविष्यात तळावातील पाण्याचा, मातीचा दर्जा चांगला राहावा यासाठी हे द्रावण नियमीतपणे वापरणे उपयुक्त होईल, अशी सुचनाही करण्यात आली.

टॅग्स :alibaugअलिबाग