मुरुड किनाऱ्यावर तेलाच्या तवंगामुळे मासेमारी धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:46 AM2018-08-24T00:46:16+5:302018-08-24T00:47:25+5:30

किनाऱ्यावर फिरताना वाळूमिश्रित तेल अंगाला, कपड्यांना लागत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.

Fisheries in danger due to oil discovery on Murud coast | मुरुड किनाऱ्यावर तेलाच्या तवंगामुळे मासेमारी धोक्यात

मुरुड किनाऱ्यावर तेलाच्या तवंगामुळे मासेमारी धोक्यात

Next

मुरु ड जंजिरा : मुरुड शहराला अडीच किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटकांसह स्थानिक नागरिकही सायंकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारताना दिसतात. मात्र, सध्या किनाºयावर तेलाचा तवंग आला आहे. किनाऱ्यावर फिरताना वाळूमिश्रित तेल अंगाला, कपड्यांना लागत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. नगरपरिषदेने किनाºयाची स्वच्छता करावी, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
भरतीमुळे तेल समुद्रकिनारी आले आहे. मुरुड शहरात सुमारे अडीच किलोमीटर परिसरात तेलाचा तवंग पसरला आहे. या तेलामुळे समुद्रातील माशांनाही धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तेलगळती नेमकी कुठून झाली आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुरुडच्या समुद्रकिनारी तेलाचा तवंग येणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. समुद्रात टाकलेल्या जाळीचे दोन्ही भाग एकमेकांना चिटकल्यामुळे जाळी गुंतते आणि मग ती सोडवण्यासाठी किमान दोन दिवस फुकट जातात, तर अनेकदा जाळी फाटतेही. दरवर्षी किनाºयावरील येणाºया तेल तवंगावर सरकारकडून योग्य उपाययोजना होणे गरजेचे आहे.
- मनोहर बैले, उपाध्यक्ष,
रायगड जिल्हा मच्छीमार सोसायटी

समुद्रकिनाºयाचे फोटो काढून सत्य परिस्थिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळास कळवणार आहोत. त्यांचे शिष्टमंडळ लवकरात लवकर याठिकाणी येथे भेट देईल व तद्नंतर त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल.
- दयानंद गोरे, मुख्याधिकारी, मुरुड

Web Title: Fisheries in danger due to oil discovery on Murud coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड