- जयंत धुळप
अलिबाग - दिल्ली डेअरडेव्हिल्स विरु द्ध राजस्थान रॉयल्स अशा आयपीएल -2018 क्रि केट सामन्याचे थेट प्रक्षेपण चालू असताना, आर्थिक फायद्याकरिता या सामन्यावर सट्टा (बेटिंग) लावणा-या खालापूर-पनवेल जुन्या हायवे महामार्गावरील वावंढळ गावीतील एका लॉजवर छापा घालून पाच जणांना रंगेहात अटक करण्याची कामगिरी गुरुवारी रात्री 12.22 वाजता रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पुणो ग्रामीण पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने केली आहे.
अटक करण्यात आलेल्या या सट्टाबाजांमध्ये विक्रम वारसमल जैन (रा.निगडी, पुणो), नरेश रामस्वरुप अग्रवाल(रा.सोमाटणो फाटा,तळेगाव, पुणो), नविन बाळकृष्ण अग्रवाल(रा.मेन बझार देहू रोड, पुणो), दिपक दौलतराम कृपलानी(जाधववाडी, पुणो) ,नदिम महिमुद्दीन पठाण (सर्व रा.देहूरोड-पुणो), या पाच जणांचा समावेश असून त्याच्या कडून 12 लाख 26 हजार 16क् रुपये किंमतीचा रोख रक्कम, कार मोबाईल, लॅपटॉप, कॅल्क्युलेटर, सेट टॉप बॉक्स, पोर्टेबल काळ्या रंगाच्या टीव्ही असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान लॉजचा मॅनेजर रविंद्र राजाराम डोंगरे (रा.चौक-खालापूर)यास देखील चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच पुणो ग्रामीण पोलीस दलातील सपोनि एम.एम. क्षीरसागर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री 12.22च्या सुमारास हा छापा घालण्यात आला. आपसांत संगनमत करून लॉज मधील रूम ताब्यात घेवून त्यांचेकडे असलेल्या डीईएन कंपनीच्या सेट टॉप बॉक्सच्या सहाय्याने एका पोर्टेबल काळ्या रंगाच्या टीव्हीवर स्टारस्पोर्ट -3 हिंदी या चॅनेलवर दिल्ली डेअरडेव्हिल्स विरु द्ध राजस्थान रॉयल्स अशा आयपीएल क्रि केट सामन्याचे थेट प्रक्षेपण चालू असताना, आर्थिक फायद्याकरिता या सामन्यावर बेटिंग लावताना सापडले.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ए.एस.आव्हाड, पोसई अमोल वळसंग, पोह्वा अमोल हंबीर, पोना प्रतिक सावंत, चापोह्वा अनिल मोरे आणि व पुणो ग्रामीण पोलीस दलातील सपोनि क्षीरसागर यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.