आक्षी गावांतील पाटील कुंटूंबातील पाच जणांनी केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 04:24 PM2018-07-04T16:24:43+5:302018-07-04T16:24:46+5:30

दिड वर्षाच्या स्वराज आणि स्वरालीची प्रकृती चिंताजनक

Five people from Shakti family of Akshi village made poison Prison | आक्षी गावांतील पाटील कुंटूंबातील पाच जणांनी केले विष प्राशन

आक्षी गावांतील पाटील कुंटूंबातील पाच जणांनी केले विष प्राशन

googlenewsNext

जयंत धुळप 

अलिबाग जवळच्याच आक्षी गावांतील पाटील कुटूंबातील पाच सदस्यांनी विष प्राषन केल्याने ते त्यांच्याच घरात  बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अत्यावस्थ अवस्थेत असल्याचे शेजारच्यांना लक्षात आल्यावर शेजारी मंडळींनी या पाचही जणांना तत्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट यांनी दिली आहे.


दिड वर्षाच्या स्वराज आणि स्वराली यांना मुंबईस नेण्याची तयारी

विष प्राशन केलेल्या पाटील कुंटूंबातील या पाच सदस्यांमध्ये रामचंद्र दत्तात्रेय पाटील(६०), त्यांची पत्नी रंजना रामचंद्र पाटील(५०), सून कविता राहूल पाटील(२५), नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष) यांचा समावेश आहे. सर्वांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. विष प्राषन केलेल्यांपैकी नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष) या दाेघांच्या डाेक्या पर्यंत विष पाेहाेचले असल्याचा निष्कर्श वैद्यकिय अदिकार्‍यांचा असल्याने या दाेघांची प्रकृती चिंताजनक आहे. परिणामी त्या दाेघांना मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात हलवावे लागणार असल्याची माहिती अलिबाग पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी दिली.


विष का प्राशन केले याचा शाेध घेत आहेत पाेलीस
पाटील कुटूंबियांनी हे विषप्राशन मंगळवारी रात्री केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घरामध्ये विष सदृष रसायनाची २५० एमएलची एक रिकामी बाटली व एक भरलेली बाटली पाेलीसांना प्राप्त झाली आहे. मात्र हेच नेमके विष त्यांनी प्राषन केले वा अन्य या बाबत मात्र अद्याप सुस्पष्टता हाेवू शकलेली नाही. दरम्यान पाटील कुटूंबियांनी विष मुळात का प्राशन केले हे पाेलीस तपासांतीच स्पष्ट हाेवू शकणार आहे.


१०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहीका आणि रुग्णवाहीकेत जाण्यासाठी डाॅक्टर नाही

जिल्हा रुग्णालयातील आराेग्य सेवेतील ढिसाळपणा या आपत्कालीन परिस्थितीतही उपस्थितांना अनूभवास आला. अत्यावस्थ रुग्णांना तत्काळ मुंबईला घेवून जाण्याकरिता १०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहीका अपेक्षीत हाेती परंतू ती उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवाहीका घेण्याचा पर्याय जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगीतला. तर अत्यावस्थ रुग्णां साेबत रुग्णवाहीकेत डाॅक्टर देणे आवश्यक असल्याचे अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट यांनी सांगीतल्यावर सरकारी डाॅक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी डाॅक्टर घेवून जावा लागेल, त्यांचे पैसे रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावे लागतील, असे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगीतले.

Web Title: Five people from Shakti family of Akshi village made poison Prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.