विनयभंग प्रकरणी पाच वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:25 AM2019-04-18T06:25:15+5:302019-04-18T06:25:19+5:30
अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उरण कोळीवाड्यात राहणारा यज्ञेश म्हात्रे यास अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची मंगळवारी शिक्षा सुनावली आहे.
अलिबाग : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उरण कोळीवाड्यात राहणारा यज्ञेश म्हात्रे यास अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची मंगळवारी शिक्षा सुनावली आहे.
पीडित मुलगी ही केवळ सहा वर्षांची आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी ८ जून २०१७ रोजी उरण पोलीसांत फर्याद दाखल केली होती. त्यामुसार उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून, तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने यज्ञेशला दोषी ठरवले.