जिल्ह्यातील सर्व सरकारी कायालये, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती त्याचप्रमाणे सरकारी, खासगी शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. ठिकठिकाणी भारत माता की जय... वंदे मातरम्चा जयघोष करण्यात आला. याचबरोबर देशभक्तीपर गीते दिवसभर कानी पडत होती, तर जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात जिल्ह्यात साजरा करण्यात आला.अलिबाग : समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे, प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी गुरु वारी येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. सागर म्हणाले की, जिल्ह्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वामध्ये अतिवृष्टीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल, भारतीय सैन्य दल, रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्य संस्था, वाईल्डर वेस्ट अॅडव्हेंचर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था अशा विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पोलीस विभाग, महसूल विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील जवळपास ३ हजार ३८२ पेक्षा अधिक पर्यटक, नागरिकांना जलद बचाव कार्य करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळण्यास यश आले. या वेळी त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकास आराखड्यानुसार आतापर्यंत ८ कामे पूर्ण झाली असून इतर कामे प्रगतिपथावर आहेत.तसेच मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिर्वतन अभियान अंतर्गत रायगड जिल्ह्यातील २२ गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक बारसगाव (ता. महाड), द्वितीय क्रमांक खरसई (ता. म्हसळा) व तृतीय क्रमांक मुठवली (ता. माणगाव) आलेला आहे. या समारंभात सागर यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. व्हिलचेअर तलवार बाजीत दिव्यांग खेळाडू संदीप प्रल्हाद गुरव यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभासाठी स्वातंत्रसैनिकांच्या पत्नी, जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.पावसाच्या हजेरीत स्वातंत्र्य दिवस उत्साहातरेवदंडा : रेवदंडा परिसरात स्वातंत्र्य दिनी पाऊस सुरू असतानाही उत्साहात साजरा झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच मनीषा चुनेकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.विविध शासकीय कार्यालये तसेच बँका आदी ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. विविध शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रस्त्यावर सकाळपासूनच पालक पाल्यांना शाळेत घेऊन जातानाची लगबग जाणवत होती. पावसाची हजेरी असतानाही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सगळीकडे जाणवत होता.महाड शहरात शोभायात्रा पाहण्यासाठी गर्दीमहाड : भारतीय स्वातंत्र्यदिन महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.या वेळी तहसीलदार चंद्रसेन पवार, नायब तहसीलदार पी. एम. कुडाळ, न.प.मुख्याधिकारी जीवन पाटील, पोलीस निरीक्षक शैलेश, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाड नगरपरिषदेत नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष वजिर कोंडिवकर, नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.महाडमधील चैतन्य सेवा संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात भारतमातेचे पूजन करण्यात आले. सकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष चेतन उतेकर, प्रसाद दाभाडकर आदी उपस्थित होते.चौक येथे तरु णांची तिरंगा बाइक रॅलीमोहोपाडा: जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली चौक जिल्हा परिषद विभागातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी तिरंगा बाइक रॅली काढली. या रॅलीत १५० पेक्षा जास्त बाइक सहभागी झाल्या होत्या. चौक येथून या बाइक रॅलीला वंदे मातरम्,भारत माता की जय अशा घोषणा देऊन सुरुवात होऊन कलोते येथे सांगता करण्यात आली. भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई-पुणे रस्त्यावरील चौक येथील डिंगरकर पेट्रोल पंपासमोरून तिरंगा बाइक रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही बाइक रॅली चौक बाजारपेठेतून फिरविण्यात आली.या वेळी भाजप युवा कार्यकर्त्यांच्या वतीने सुषमा स्वराज व इतर मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोल्हापूर, सांगली येथील जनतेचे महापुरात फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर बाइक रॅली कलोते येथे येताच शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, चौक भाजप जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.बचाव कार्य करणाऱ्यांचा सन्मानमहेश सानप (वाईल्डर वेस्ट अॅडव्हेंचर स्पोर्ट्स कोलाड, ता.रोहा), गुरुनाथ साठेलकर (अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली), सचिन शिंदे (निसर्ग मित्रमंडळ सामाजिक संस्था पनवेल), राजू पिचिका (जैन समाज पेण), सचिन मधुकर पाटील (कणे, ता.पेण), संदेश कमलाकर गडखळ (वेलटवाडी, ता.अलिबाग), जितेंद्र अनंत गोंधळी (खानाव, ता.अलिबाग), संजय सारंग पथक प्रमुख सुरक्षारक्षक (अलिबाग), सागरी सुरक्षा पथक (भिलजी, ता.अलिबाग), सागरी सुरक्षा पथक रामराज (ता.अलिबाग), अशोक धोंडू तांबडे, पोलीस पाटील (मिठेखार ता.मुरुड), अध्यक्ष लायन्स क्लब (अलिबाग), अनिल रामचंद्र माने (चिंचवलीवाडी, ता.माणगाव), बबन गणपत माने (चिंचवलीवाडी, ता.माणगाव), ऋषिकेश अनंत लकेश्री (नाते, ता.महाड), अनिल रामराव मोरे (बिरवाडी, ता.महाड), लक्ष्मण गजानन वाडकर (बिरवाडी, ता.महाड), विजय लक्ष्मण जाधव (आसनपोई, ता.महाड), चैतन्य प्रकाश म्हामुणकर (आकले, ता.महाड), संदीप गोपाळ झांजे (ता.महाड), उमेश अशोक मिंडे, (ता.महाड), सचिन रमेश भिंडे (ता.महाड),सिद्धेश सुरेश निवाते (ता.महाड), चिंतर वैष्णव (ता.महाड), रोशन रवींद्र रुईकर (ता.सुधागड पाली), मंगेश मारुती मुळे (ता.सुधागड पाली), अजय अजित मुळे (ता.सुधागड पाली) यांनाही प्रशस्तिपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.कर्जत तालुक्यात ध्वजारोहणकर्जत : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७२व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, पंचायत समिती कार्यालयात उपसभापती काशिनाथ मिरकुटे, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत कार्यालयामध्ये उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, तहसील कार्यालयात तहसीलदार अविनाश कोष्टी, कर्जत न्यायालयात न्यायाधीश मनोज तोकले, कर्जत उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
‘भारत माता की जय’च्या घोषणेने दणाणले मुरुडआगरदांडा : भारतीय स्वातंत्र्य दिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी सर्व ग्रामपंचायत कार्यालय, शहरात सकाळी ध्वजारोहण कार्यक्रमाने संपन्न झाला. आझाद चौकातील ध्वजारोहण मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भारत माता की जय, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, अशा घोषणा देत मुरुड तहसीलदार कार्यालयापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली.मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या प्रांगणात उपनगराध्यक्ष नौसिन दरोगे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडित, गटनेते मुग्धा जोशी, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली. तहसीलदार कार्यालयात मुरुड तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक व विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी व नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आदिवासी लोकांसाठी विशेष कार्य करणारे मुरुड येथील समाजसेवक जाहीद फकजी यांना पंचायत समितीच्या सभापती नीता घाटवळ यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर राज कल्याणी यांना जीवन आरोग्यवर्धिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच मुरुड तहसीलदार येथील शिपाई प्रेमनाथ पाटील यांना ५७हजार रुपये तहसीलदार कार्यालयात सापडले. पाकीट मूळ मालकांना परत केले त्याबद्दल मुरुड उपनिरीक्षक विजय गोडसे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी उदय खोत, निलोफर हमडुले, अमृत आरेकर ,प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, अनुज भोईर, प्राची अदावडे, आशिया कबले, शेतकरी- भिकू गायकर, पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे आदी मान्यवरांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तहसीलदारांचे आवाहनसांगली व कोल्हापूर येथे पूर येऊन खूप आर्थिक नुकसान झाले आहे. तरी सर्वांनी मदत केली पाहिजे. मुलांसाठी शालेय वस्तू किंवा रोख रक्कम स्वरूपात जमा करावी व ती पूरग्रस्त लोकांना देण्यात यावी, असे आवाहन मुरुडचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले. या वेळी तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहणासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक व विविध खात्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पेणमधील २६१ शाळांमध्ये ध्वजारोहणपेण : पेणमध्ये ७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. तालुक्यातील २२२ प्राथमिक शाळा, ३९ माध्यमिक प्रशालांसह ६४ स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले. पहाटेपासून सर्व ठिकाणी आनंदी वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ७ वाजता मराठी शाळांमधील विद्यार्थी वर्गाच्या गावागावात प्रभातफेरी निघून विद्यार्थी वंदे मातरम्,भारत माता की जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.राष्ट्रीय सणाचा हा माहोल पाहता पहाटेच्या अंधारात वीज गायब असून देखील गावे जागी होती. पावसाची रिमझिम सुरू त्यात विद्यार्थी वर्गाच्या घोषणांचा पाऊस सारे काही आनंदी वातावरण निर्माण झाले होते. ७.३०ते ८.०० वाजता झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्र गीत व देशभक्तीपर गीते झाली. विद्यार्थ्यांची भाषणे, गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाले. एकूणच पेणमध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पेण तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पेण नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी ध्वजारोहण केले. महात्मा गांधी ग्रंथालय वाचनालयात ध्वजारोहण अध्यक्ष अरविंद वनगे यांनी केले. शाळा महाविद्यालयाच्या व शासकीय कार्यालयात तेथील प्रमुख अधिकारी व मान्यवर मंडळींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पोलीस ठाण्यात बँका, पतसंस्था, ग्रामपंचायत आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.