शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
2
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
5
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
6
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
7
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
8
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
9
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
10
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
11
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
12
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
13
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
15
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
16
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
17
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
18
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
19
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
20
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘फ्लोटिंग बोयाज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 3:31 AM

गेल्या चार ते पाच वर्षांत रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासाठी आलेल्या आणि भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने, बुडून

अलिबाग : गेल्या चार ते पाच वर्षांत रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासाठी आलेल्या आणि भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने, बुडून मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटक सुरक्षितता उपाययोजनेंतर्गत, समुद्रात पोहण्यासाठी सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्रकिनाºयांवर एकूण ११५ ‘फ्लोटिंग बोयाज’ बसविण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून प्रत्यक्षात १५५ फ्लोटिंग बोयाज खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.पहिल्या टप्प्यात मुरुड आणि काशीद या दोन बीचेसवर हे बोयाज बसविण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा अभिनव उपक्रम रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून साकारत असून, त्याची अंमलबजावणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पाच लाख २० हजार रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी करून दिली आहे.पर्यटक सुरक्षाव्यवस्थेअंतर्गत बीचवर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाज लावण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशीद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांडवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई आदी सर्व प्रमुख समुद्रकिनाºयांवर हे बोयाज लावण्याचे काम सुरू आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पाठक यांनी दिली.समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविणे, तसेच धोकादायक पातळी दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाजचा वापर होतो. समुद्रकिनाºयापासून साधारणत: ५० ते ६० मीटर अंतरावर किंवा भरती ओहोटीच्या पातळ्यांचा अभ्यास करून व स्थानिकांच्या अनुभवाच्या आधारे ही ठिकाणे निश्चित करण्यात येतात. त्यावर हे बोयाज लावण्याचे काम सध्या सुरू आहे.फ्लोटिंग बोयाज नेमके काय?बोयाज म्हणजे भगव्या रंगाचा एक तरंगता मोठा चेंडू, त्याला वर एक निशाणी पताका लावलेली असते. खाली किमान १० मीटर लांबीच्या दोरखंडाला तो बांधून त्याला खालच्या बाजूला दीड फूट रु ंद आणि दोन फूट लांब, अशी सिमेंटची प्लेट लावलेली असते. त्यामुळे फ्लोटिंग बोयाज पाण्यात स्थिर राहतो. हे बोयाज खालून एकमेकांना दोरखंडाने बांधलेले असल्याने ते एका रेषेत राहतात. त्यावरूनच पोहणाºयांना सुरक्षित हद्द ओळखता येते.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपयुक्त उपक्र म असून, यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात येणाºया पर्यटकांनाही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. बीचनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने साधारणपणे साडेतीन फूट खोलीच्या पुढे समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. मद्यपान करून पोहू नये. जीव धोक्यात घालून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये, स्वत:ची जबाबदारी ओळखून समुद्रात पोहण्यासाठी उतरावे. प्रशासनाने प्रत्येक बीचवर लावलेल्या सुरक्षा सूचना व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.