अलिबागमध्ये पूरपरिस्थिती, नुकसानग्रस्तांना भरीव भरपाई द्या- जि.प. माजी सदस्या मानसी दळवी
By निखिल म्हात्रे | Published: July 9, 2024 12:15 AM2024-07-09T00:15:51+5:302024-07-09T00:16:30+5:30
महसूल प्रशासनही नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसले
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यात रात्रीपासून वादळी पावसाने थैमान घातला आहे. तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तालुक्यात 170 मिमी पाऊस पडला पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हापरीषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी यांनी पुरर्जन्य परीस्थिती ठिकाणी भेटी देऊन तत्काळ नुकसानीचे पंचनामे करा, असे आदेश अलिबाग तहसिलदार यांना दिले आहेत. महसूल प्रशासन ही नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसत होते.
अलिबाग शहरात पीएनपी नगर, रामनाथ, खंडाळा, नेहूली, रामराज, सहाण, मल्याण, बोरघर, रामराज, भिलजी या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. गेल कंपनीने पाण्याचे मार्ग बदलल्याने मल्याण येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेथील गावकऱ्यांनी मानसी दळवी यांना कळविताच तत्काळ तेथे त्यांनी गेल कंपनीच्या प्रशासनाला सोबत घेत भेट देत नागरीकांना तत्काळ नुकसान भरपाई द्या असे आदेश दिले. गेल प्रशानाने त्याची दखल घेत गावकरी, स्थानिक नेते व आमदार अशी एक बैठक घेऊन नुकसानग्रस्तांचा प्रश्न सोडविणार असल्याची हमी दिली आहे.
नेहूली बोरघर, रामराज, भिलजी गावातील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या गावातील नागरीकांचे कपडे, घरातील इलेक्ट्राॅनिक वस्तु, बेड इत्यादीचे नुकसान झाले. तसेच घरातील रेशन हि खराब झाल्याने नागरीक अस्वस्थ झाले होते हे लक्षात घेऊन आमदार महेंद्र दळवी यांनी तातडीने शासकीय यंत्रणा कामाला लाऊन मल्याण, बोरघर, रामराज, भिलजी गावात पावसामुळे झालेला नुकसानाचा पंचनामा करीत झालेली नुकसान भरपाई भरून देण्याची हमी त्यांनी दिली आहे.
अलिबाग तालुक्यात पुरजन्य परीस्थिती निर्णाण झाली आहे. सकाळपासून पुरग्रस्त गावांना भेटी देत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे तलाठ्यांकडून करून घेतले. तसेच शासनाकडून पुरग्रस्तांना मोठ्याप्रमाणात नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- मानसी दळवी, माजी जिल्हापरीषद सदस्य.
रविवारी रात्रीपासून अलिबागमध्ये जारदार पावसाळा सुरुवात झाली होती. त्यामुळे तालुक्यात कुठे हि जीवित हानी होऊ नये याची दक्षता घेतली होती. मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना आपापल्या विभागात दक्ष राहून नुसकान ग्रस्त ठिकाणी तत्काळ पंचनामे करून ते कार्यवाहीसाठी पाठविण्याचे आदेश दिले होते.
- विक्रम पाटील, अलिबाग तहसिलदार.