दासगावमध्ये पूरस्थिती; शेती पाण्याखाली

By Admin | Published: June 27, 2017 03:22 AM2017-06-27T03:22:48+5:302017-06-27T03:22:48+5:30

संततधारा एक दिवस पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण महाड तालुक्यातील नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. सावित्री व काळ नदी

Flooding in Dasgaon; Agriculture under water | दासगावमध्ये पूरस्थिती; शेती पाण्याखाली

दासगावमध्ये पूरस्थिती; शेती पाण्याखाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : संततधारा एक दिवस पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण महाड तालुक्यातील नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. सावित्री व काळ नदी मोठ्या प्रमाणावर भरून वाहू लागल्याने दासगाव परिसरात शेतीमधून पाणी शिरून पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या सुरुवातीलाच प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
१ जूननंतर रिमझिम पावसाने सुरुवातच केली. बळीराजा पावसावर आनंदी होता. दोन दिवसांपूर्वीच महाड तालुक्यात काही भागात लावणीला सुरुवातही झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच अचानक तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. १ जून ते २६ जूनच्या दुपारपर्यंत ४०१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये काल सोमवारी ४ तासांत ४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे दासगाव खाडीपट्ट्यात सावित्री खाडी उलटून शेतात पुराचे पाणी घुसून पूरस्थिती निर्माण झाली आहे.
महाड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या आशंका वर्तवण्यात आल्या असून, त्या त्या गावांना प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दासगाव यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ११ वर्षे प्रशासनाचे आवाहन दासगावकर नागरिकांना मात्र कालच्या या पुरामुळे कोणतीच भीतीसारखा परिणाम झाल्याचे दिसून मात्र आलेला नाही.

Web Title: Flooding in Dasgaon; Agriculture under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.