राबगाव/पाली : महाराष्ट्रात यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सगळीकडे चारा टंचाई निर्माण होऊ शकते. शासनच्या आकडेवारीनुसार १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून यामुळे तीव्र चारा टंचाई भासू शकते.संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. सदर निधीमधून टंचाईग्रस्त तालुक्यातील सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालक/शेतकरी यांना वैरण बियाणे व खते वितरित करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात वितरण करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार अध्यक्ष तहसीलदार, सहअध्यक्ष गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सदस्य सचिव पशुधन अधिकारी विस्तार हे निवड करणार आहेत. त्यानुसार तयार झालेला चारा हा त्या शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन उर्वरित चारा हा शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे चारा डेपो तसेच पशुधन छावण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सुधागड तहसीलदार बी.एन. निंबाळकर यांनी निवड करण्यात आलेल्या शेतकºयांना बियाणे तसेच खतांचे वाटप केले. या वेळी निंबाळकर म्हणाले, रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव आणि श्रीवर्धन तालुक्याची या योजनेसाठी निवड झाली असून दुष्काळाच्या समस्येवर आपण सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम केले तर मात देऊ. तसेच तालुक्यातील शेतकºयांना आर्थिकदृष्ट्यादेखील सक्षम बनवता येईल.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून जलाशयाच्या तसेच तलावाखालील जमिनीचा वापर करून चारा पिके घ्यायची आहेत, याबाबत सुधागड तालुक्यातील कवेळे, उन्हेरे, कोंडगाव, घोटवडे आणि ढोकशेत येथील गाळप क्षेत्रात लागवड करण्यासाठी अर्ज मागवण्याच्या सूचना केल्या आहेत.एक रुपया भाडेतहसीलदारांनी सुधागड तालुक्यातील कवेळे, उन्हेरे, कोंडगाव, घोटवडे आणि ढोकशेत येथील लघुपाटबंधारे क्षेत्रातील गाळप क्षेत्रात लागवड करण्यासाठी अर्ज मागवण्याच्या सूचना केल्या आहेत.त्यानुसार १ रु पया भाड्याने सदरचे क्षेत्र भाड्याने देण्याच्या सूचना तहसीलदार निंबाळकर यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.
सुधागडमध्ये वैरण बियाणे, खतवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:32 PM