नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था पाळा
By admin | Published: October 13, 2015 02:01 AM2015-10-13T02:01:08+5:302015-10-13T02:01:08+5:30
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सभा पोलीस ठाण्याजवळील दत्तमंदिराच्या सभामंडपात पार पडली.
मोहोपाडा : रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सभा पोलीस ठाण्याजवळील दत्तमंदिराच्या सभामंडपात पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सर्व मंडळांचे कर्तव्य असून, गरबा खेळताना मुली किंवा महिलांची छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्ती तसेच मंडळावर कठोर कारवाई केली जाईल, शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी. उत्सवात पावित्र्य राखा, रात्री स्वयंसेवक नेमा तसेच स्थापनेपासून विसर्जनापर्यंत व्यवस्थित जबाबदारी पार पाडा, असे शिंदे यांनी सांगितले. या सभेला रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, भोईर यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आदींसह नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)