लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आण्याकरिता राज्य सरकारने राज्यात कडक लाॅकडाऊन करून त्याची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मुरूड शहरात कडक निर्बंध घालण्यात आले. सकाळी ७.३० ते सकाळी ११ पर्यंतच दुकाने चालू राहतील याची माहिती मुरूड पोलिसांनी गाडीतून लाऊड स्पिकरद्वारे संपूर्ण मुरूड शहरात दिली.
यावेळी मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे, उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस नाईक किशोर बठारे, पोलीस शिपाई परेश म्हात्रे, पोलीस शिपाई धनंजय पाटील, पोलीस शिपाई उमेश शिंदे, पोलीस शिपाई प्रशांत लोहार, होमगार्डस सार्थक शेडगे, आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे यांनी राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुण वाढत आहे. त्याबरोबर मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे राज्यसरकारांनी कडक लाॅकडाऊन करून नियमावाली जाहीर केली आहे. त्या नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे यावेळी केले. त्याबरोबर वाहन चालकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नका, नाहीतर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे यांनी सूचित केले.