वाहतुकीच्या नियमांचे पालन करा
By Admin | Published: January 21, 2016 02:40 AM2016-01-21T02:40:24+5:302016-01-21T02:40:24+5:30
धकाधकीच्या जीवनात माणसाकडे कामे खूप आणि वेळ कमी पडू लागला आहे. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे माणूस माणसापासून
धाटाव : धकाधकीच्या जीवनात माणसाकडे कामे खूप आणि वेळ कमी पडू लागला आहे. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे माणूस माणसापासून अधिकच दूर जात असल्याचे जाणवू लागले आहे. दळणवळणासाठी गाव तिथे रस्त्याचा विकास होत असल्याने कित्येक गावे रस्त्यांमुळे एकमेकांना जोडली आहेत. यामुळे दिवसेंदिवस रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत अधिकच वाढ होत असल्याचे दिसते. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हीच काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते संजय वाढवळ यांनी व्यक्त केले.
अपघातात निरपराधांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र काहींना गंभीर दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व घेऊन जगावे लागत आहे. तर अनेकांची कुटुंबे बेघर झाल्याचे ऐकावयास मिळत आहेत, असे वाढवळ म्हणाले. वरदायिनी हायस्कूल महागाव येथे इ. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थी वर्गाला नुकत्याच आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्र मात अपघातातून सावधानता कशा प्रकारे बाळगावी या संदर्भात संबोधिताना ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक सागडे, खिलारे यांसह सर्व कर्मचारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढवळ म्हणाले की, ८० टक्के अपघात हे माणसअच्या चुकांमुळे होतात. मोबाइल कानाला लावून वाहन चालवणे, मोबाइलच्या हेडफोनवरु न गाणी ऐकणे तर काही अपघात तंबाखू सेवन व मद्यपान करीत ओव्हरटेक करताना होत आहेत. मात्र या व्यतिरिक्त सध्या तरुणाईला सेल्फीचे वेड लागल्यामुळे डोंगरदऱ्या- खोऱ्यातून जीवाची तमा न बाळगता फोटो काढताना अनेक जणांना जीव गमवावा लागत आहे. (वार्ताहर)