एकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:18 PM2018-10-23T22:18:48+5:302018-10-23T22:19:30+5:30
सावली (मुरुड) गावातील घटना
जयंत धुळप
अलिबाग - येथील सावली (मुरुड) गावाचे रहिवासी असलेल्या कांबळे कुटूंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यानंतर, या सर्वांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुरुडचे पोलीस निरिक्षक किशोर साळे यांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारासा ही घटना उघडकीस आली.
मुरूड पोलीस स्टेशन हद्दीतिल सावली गावातील कांबळे कुटुंबिय हे त्यांचे कडे असलेल्या पिंड दानचे कार्यक्रमा करीता सर्व कुटुंबिय व गावातील इतर नातेवाईक असे 30 लोक दोन पिकअप गाडीने मंगळवारी सकाळी 07. 00 वा हरिहरेश्वर येथे निघाले त्या सर्वांचे जेवणा साठी पहाटे बनविलेल्या भाकरी, बटाटया ची भाजी व मिर्चिची चटणी असे सोबत घेतले होते. दुपारी पिंड दाना नंतर 02.30 वा सगळे जेवन करुण परत 05.30 वा चे दरम्यान सावली गावत आले. नंतर या पैकी 15 लोकांना उलटी चा त्रास होऊन पोट दुखु लागल्याने त्या सर्वाना मुरूड ग्रामीण रूग्णालयात उपचारा करीता दाखल केले आहे . सर्वांची प्रकृति स्थिर आहे. पैकी 1 सात वर्षाची मुलगी असुन इतर सर्व 30 ते 40 वयोगटतील स्री पुरूष आहेत.