मराठा आंदाेलकांचा पाेलिसांना चकवा; मांडवामार्गे गाठली मुंबई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:59 AM2020-12-15T00:59:41+5:302020-12-15T00:59:50+5:30

रायगड पाेलिसांनी केला इन्कार

Fool the Maratha agitators | मराठा आंदाेलकांचा पाेलिसांना चकवा; मांडवामार्गे गाठली मुंबई?

मराठा आंदाेलकांचा पाेलिसांना चकवा; मांडवामार्गे गाठली मुंबई?

Next

रायगड : मराठा आंदाेलकांना मुंबईत जाऊ न देण्यासाठी रायगड पाेलिसांनी चांगलीच व्यूहरचना आखली हाेती. मात्र आंदाेलकांनी पाेलिसांना चकवा देत चक्रव्यूह भेदले. त्यांनी थेट समुद्रमार्गे मुंबईतील आझाद मैदान गाठल्याची जाेरदार चर्चा जिल्ह्यात आहे. मात्र रायगड पाेलिसांनी याचा इन्कार केला आहे.
मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या कालावधीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदाेलकांनी माेठ्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानावर जमण्याचा फतवा निघाला हाेता. त्यामुळे माेठ्या संख्येने आंदाेलक मुंबईकडे जाणार हे सरकारने गृहीत धरले हाेते. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी सरकारने आंदाेलकांची नाकाबंदी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर, चाैक, खारपाडा, दादर सागरी, मांडवा जेटी या ठिकाणी माेठ्या संख्येने पाेलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस नेमले आहेत. ताब्यात घेण्याच्या भीतीमुळे आंदाेलक कदाचित वाहनांवर झेंडे लावणार नाहीत, मात्र त्यांच्या वाहनांमध्ये झेंडे, फलक, टाेप्या अशी साधने असतील. ती शिताफीने शाेधून आंदाेलकांना ताब्यात घेण्याच्या सूचना संबंधित पाेलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पाेलीस अधीक्षकांनी दिल्या हाेत्या. त्यानुसार चेकपाेस्टवर कडक चेकिंग केली जात हाेती. याबाबतची माहिती आंदाेलकांनाही मिळाली हाेती. त्यामुळे रविवारीच त्यांनी आपला माेर्चा अलिबागकडे वळवला.

मांडवा येथे गर्दी
पयर्टकांमध्ये आंदाेलक आहेत की आंदाेलकांमध्ये पर्यटक हे काेणीच ओळखू शकत नाही अथवा सांगूही शकत नाही. त्यामुळे त्यांना अडवणार कसे, असा प्रश्न पाेलिसांसमाेर निर्माण झाला असल्याचेही बाेलले जाते. साेमवारीही जलमार्गे प्रवासी वाहतूक सुरू हाेती. मात्र रविवारी असणारी गर्दी सोमवारी नव्हती.

पर्यटक ताटकळत
अलिबाग-मांडवा येथून ते बाेटीने मुंबईमध्ये दाखल झाल्याचे बाेलले जाते. मांडवा या ठिकाणी रविवारी सुमारे दहा हजारांच्या संख्येने पर्यटक मुंबईकडे जाण्यासाठी ताटकळत हाेते. त्यामध्ये आंदाेलकही असण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे एका पाेलीस अधिकाऱ्याने सांगितले.

वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही याेग्य ती खबरदारी घेतली आहे. प्रत्येकाच्या आळखपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. समाेरची व्यक्ती आंदाेलक आहे अथवा अन्य त्यांचे फेस रीडिंग आणि बाॅडी लँग्वेज साधारण कळते. त्यामुळे या मार्गे आंदाेलक गेलेले नाहीत.
- र्मराज साेनके, पाेलीस उपनिरीक्षक, मांडवा

Web Title: Fool the Maratha agitators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.