जेएनपीएतुन २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त, पाच अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 04:56 PM2023-05-14T16:56:45+5:302023-05-14T16:58:51+5:30

डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारावर तस्करीच्या मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा जेएनपीए बंदरातुन निर्यात करण्यात आला असल्याची माहिती मुंबई डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

Foreign cigarette stock worth 24 crore seized from JNPA: Five arrested | जेएनपीएतुन २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त, पाच अटकेत

जेएनपीएतुन २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त, पाच अटकेत

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : न्हावा- शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींच्या ई- सिगारेटचा साठा जप्त करण्याची घटना ताजी असतानाच शुल्क विभागाच्या मुंबई डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेला २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा रविवारी (१४) जप्त केला आहे.जेएनपीए परिसरातील आर्शिया वेअरहाऊसमध्ये ४० फुटी कंटेनरमधुन एक कोटी २० लाख प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला असुन या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारावर तस्करीच्या मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा जेएनपीए बंदरातुन निर्यात करण्यात आला असल्याची माहिती मुंबई डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तपासाला सुरुवात केली होती.कसुन करण्यात आलेल्या तपासात जेएनपीए परिसरातील आर्शिया वेअरहाऊसमधील ४० फुटी एक कंटेनर संशयाच्या फेऱ्यात अडकला.या संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंध असलेल्या व विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेल्या गुडंग गरम, डनहिल,बेन्सन ॲड हेजेस, ईसी लाईट,मोड आदी प्रकारातील एक कोटी २० लाख सिगारेटचा साठा आढळून आला.डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ कोटी किंमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे.याप्रकरणी पाच संशयितांनाही अटक करण्यात आली आहे.अधिक तपास सुरू असल्याची माहिती डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दोन दिवसांपूर्वीच न्हावा- शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींच्या ई- सिगारेटचा साठा जप्त केला आहे.

Web Title: Foreign cigarette stock worth 24 crore seized from JNPA: Five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.