शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जेएनपीएतुन २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त, पाच अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 4:56 PM

डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारावर तस्करीच्या मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा जेएनपीए बंदरातुन निर्यात करण्यात आला असल्याची माहिती मुंबई डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मधुकर ठाकूर

उरण : न्हावा- शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींच्या ई- सिगारेटचा साठा जप्त करण्याची घटना ताजी असतानाच शुल्क विभागाच्या मुंबई डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेला २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा रविवारी (१४) जप्त केला आहे.जेएनपीए परिसरातील आर्शिया वेअरहाऊसमध्ये ४० फुटी कंटेनरमधुन एक कोटी २० लाख प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला असुन या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारावर तस्करीच्या मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा जेएनपीए बंदरातुन निर्यात करण्यात आला असल्याची माहिती मुंबई डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तपासाला सुरुवात केली होती.कसुन करण्यात आलेल्या तपासात जेएनपीए परिसरातील आर्शिया वेअरहाऊसमधील ४० फुटी एक कंटेनर संशयाच्या फेऱ्यात अडकला.या संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंध असलेल्या व विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेल्या गुडंग गरम, डनहिल,बेन्सन ॲड हेजेस, ईसी लाईट,मोड आदी प्रकारातील एक कोटी २० लाख सिगारेटचा साठा आढळून आला.डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ कोटी किंमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे.याप्रकरणी पाच संशयितांनाही अटक करण्यात आली आहे.अधिक तपास सुरू असल्याची माहिती डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दोन दिवसांपूर्वीच न्हावा- शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींच्या ई- सिगारेटचा साठा जप्त केला आहे.