साळोखेतील अनधिकृत वराह पालन शेडवर वनविभागाचा हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:27 PM2019-03-04T23:27:09+5:302019-03-04T23:27:18+5:30
कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नारळेवाडी येथील वन जमिनीवरील अनधिकृतपणे उभारलेल्या वराह पालन शेडवर वन अधिकाऱ्यांनी कारवाई करून जमीनदोस्त केले.
नेरळ : कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नारळेवाडी येथील वन जमिनीवरील अनधिकृतपणे उभारलेल्या वराह पालन शेडवर वन अधिकाऱ्यांनी कारवाई करून जमीनदोस्त केले.
जेसीबीच्या साहाय्याने शेडचे बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, १२५ पत्रे, ५४२ लोखंडी पाइप त्याचप्रमाणे १००० लिटरच्या पाण्याच्या टाक्या इत्यादी बांधकाम साहित्य जप्त केले. तसेच शेड मालकावर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून नारळेवाडी परिसरात मुंबईतील धनिक जोसेफ डिसोझा व पियर डिसोझा यांनी आदिवासी जमीन खरेदी करून त्यावर बेकायदेशीररीत्या शेड बांधली होती. त्याठिकाणी वराह पालनचा व्यवसाय सुरू केला आहे. सदरच्या जमिनीचा खातेदार आदिवासी असून सातबारा उताऱ्यावर (सर्व्हे नंबर ७४/२) महाराष्ट्र शासन खाजगी वने, अशी नोंद आहे. असे असतानाही वनविभागाची कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नसताना स्थानिक ग्रामपंचायतीच्या परवानगीने त्या जागेवर पक्के दोन शेड उभारले. त्या ठिकाणी वराह पालनाचा व्यवसाय करत होते.
वराह पालनामुळे होणाºया दुर्र्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रास होत असून यास स्थानिकांचा विरोध आहे. शेडमधून निघणाºया मलयुक्त घाणीचे कोणत्याही प्रकारची प्रक्रि या करून विल्हेवाट न लावल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात तर हेच मलयुक्त घाण पाण्याच्या प्रवाहात परिसरातील नदी नाल्यात जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आल्याचे गावकऱ्यांचे यांचे म्हणणे आहे. त्याकरिता साळोख येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. साळोख येथील तंटा मुक्ती अध्यक्ष शोएब बुबेरे यांनी वन विभागाकडे तक्रार केल्यावर कारवाई केली.
>मागील आठ वर्षा पासून हा अवैध वराह पालनचा व्यवसाय सुरू असून त्याच्या घाणीपासून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आम्ही ग्रामस्थांनी संबधित विभागास वारंवार तक्र ार करूनही काही कारवाई होत नव्हती. अखेर आता कारवाई झाली आहे.
- शोएब बुबेरे, तंटा मुक्ती अध्यक्ष
>नारळेवाडी येथील वन विभागाच्या जागेवर उभारलेल्या वराह पालन शेड विषयी तक्र ार आली असता वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाने सदरचे शेड पाडण्यात आले आहे. सध्या शेडमध्ये असलेल्या जनावरे स्थलांतरित करण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली असून त्यानंतर दुसरे शेडही हटविण्यात येईल. या संबंधी शेड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.
- जयवंत सुपे, वनपाल-पोही