योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील नागरिकांना नियमांचे बंधन घालणाऱ्या महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये नियम पाळण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयांमध्ये नियमांचे पालन केले जात नसून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई शहरात सुरक्षितता बाळगण्याच्या दृष्टीने सोसायट्या, बँका, कार्यलये आदी ठिकाणी ये-जा करणाºया नागरिकांचे तापमान थर्मल गनद्वारे तापमान तपासले जात आहे. महापालिका कार्यालयातही येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी सुरक्षारक्षकांकडे थर्मल गन देण्यात आल्या आहेत, परंतु तापमान मोजण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, कोणतीही चौकशी, नोंद न होता, नागरिक ये-जा करीत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील घरोघरी जाऊन थर्मल गनद्वारे प्रत्येक व्यक्तीचे तापमान व आॅक्सिमिटरद्वारे प्रत्येकाच्या शरीरातील प्राणवायूची पातळी मोजली मोजली जात आहे, परंतु महापालिकेच्या मुख्यालयासह शहरातील विभाग कार्यालयांमध्ये ये-जा करणाºया व्यक्तींच्या तापमानाची तपासणी करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांमध्येही मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन केले जात नाही. काही विभाग कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्यांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन बसविण्यात आले आहेत, परंतु या वॉश बेसिनचा वापरही केला जात नाही.
आजवर महापालिकेच्या मुख्यालय, विभाग कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. काही कर्मचाºयांचा मृत्यूही झाला आहे. महापालिका कार्यालयांमध्ये प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पालिका मुख्यालयमहापालिका मुख्यालयात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह विविध कामानिमित्त दिवसभर ये-जा करणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येणाºया नागरिकांची तपासणी करण्यासाठी सुरक्षारक्षकांकडे थर्मल गन देण्यात आल्या आहेत, परंतुप्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात नाही. तळमजल्यावर मुख्यालयात येणाºया नागरिकांची नोंद आणि तपासणी करण्यासाठीही सुरक्षारक्षक अनेक वेळा उपस्थित नसल्याचे समोर आले असून, त्यांची कोणतीही तपासणी होत नाही.बेलापूर विभाग कार्यालय : महा पालिकेच्या बेलापूर विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. ते मास्क काढून बसत आहेत. या ठिकाणी ये-जा करणाºया कोणत्याही व्यक्तीची चौकशी किंवा नोंद केली जात नाही, तसेच थर्मल गनद्वारे तापमान तपासले जात नाही.नेरुळ विभाग कार्यालय : महापालिका शाळेच्या इमारतीच्या काही भागांत नेरुळ विभाग कार्यालय सुरू केले आहे. तेथेही सुरक्षारक्षक नियुक्त आहेत. नागरिक, अधिकारी,कर्मचाºयांचे शारीरिक तापमान घेण्यासाठी त्यांच्याकडेही थर्मल गन दिली आहे, परंतु कोणत्याही नागरिकाची तपासणी केली जात नाही. अनेक वेळा सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळले.तुर्भे विभाग कार्यालय : महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातही अधिकारी, कर्मचारी, तसेच नागरिकांची वर्दळ आहे. पाणी आणि मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिक येत असतात. सुरक्षारक्षक असले, तरी त्यांच्याकडूनही कोणत्याही व्यक्तीची चौकशी अथवा अधिकारी, कर्मचारी, नागरिक कोणाचीही तपासणी केली जात नाही.