मतभेद विसरून समन्वयाने काम कारा- खा. सुनिल तटकरे

By निखिल म्हात्रे | Published: January 14, 2024 07:09 PM2024-01-14T19:09:46+5:302024-01-14T19:10:01+5:30

'मैत्रीपुर्ण लढत कराची ठरविले तर माझ्या उमेदवारांना निवडून आणन्याचा दिलेला शब्द मी पाळतो.'

Forget differences and work in coordination. Sunil Tatkare | मतभेद विसरून समन्वयाने काम कारा- खा. सुनिल तटकरे

मतभेद विसरून समन्वयाने काम कारा- खा. सुनिल तटकरे

अलिबाग - राज्यात महायुतीमध्ये तिन प्रमुख पक्षांसहीत 12 घटक पक्ष असून त्यांना एकत्रीत आणन्यासाठी रविवारी एकाच दिवशी ३६ जिल्ह्यांत समन्वय मेळावे घेण्यात आले. यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. १५ राजकीय पक्षांच्या समन्वयातून आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे आता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरुन एकत्रीतपणे कामाला सुरुवात करणे अत्यावश्य असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले. तसेच एकदा मैत्रीपुर्ण लढत कराची ठरविले तर माझ्या उमेदवारांना निवडून आणन्याचा दिलेला शब्द मी पाळतो अशी कोपरखळी ही तटकरे यांनी लगावली.

अलिबाग येथील समुद्र किनारी आयोजित महायुती मेळाव्यात व्यासपीठावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, आमदार रविंद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार अनिकेत तटकरे, भाजप चे महाराष्ट्र महामंत्री विक्रांत पाटील,माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, माजी आमदार सुरेश लाड,उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, महिला अध्यक्षा उमा मुंडे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील महेश मोहिते, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी काही दिवसापूर्वी समन्वय मेळावे घेण्याचे ठरले. त्यानंतर या कार्यक्रमाची पुर्व तयारी करून प्रत्येक जिल्ह्यात आज समन्वय मेळावे होत आहेत. जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून रायगडचा विकास झपाट्याने होत आहे. तसेच पर्यटन स्थळांचे सुशोभिकरण झाल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक जिल्ह्यात पर्यटनासाठी येत असल्याने भविष्यात रायगडचे चित्र बदलले जाणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार विकास काम जलद गतीने करीत आहे. हेच खरे महायुतीवर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले शेतकरी यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजना अंतर्गत 6 हजार शेतकऱ्यांना मिळत असताना राज्य सरकार कडून सहा हजार असे मिळून  बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. जिल्ह्यात शिवसेना व भाजपा मोदीयांच्या धेय्य व धोरणांमुळे वाढत आहे. अनंत गिते यांनी आठवेळा लोकमसभा निवडणूक भाजप सोबत लढविल्या. त्यामुळे आता भाजपला नेस्तनाबूत करणार वक्तव्य त्यांना अशोभनिय आहे. सरकारने विकासाचे अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच शासन आपल्या दारी अभियानच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे निकाली काढले आहेत.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर हे मेळावे संपन्न होत आहे. प्रमुख पक्षाचे पदाधिकारी या जिल्ह्याचे नेतृत्व कोणाच्या हातात दय्याचे आहे. यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख कार्यकर्ते यांचा मनोमिलन व्हावे त्यासाठी मेळावा घेत आहोत. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचे नेतृत्व पुन्हा आपल्याला द्याचे असेल तर यासाठी महा युतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल मनोमिलन करून आता पासूनच कामाला लगण अत्यावश्यक आहे.

जिल्ह्यात महायुतीचा एकत्र मेळावा कधी होणार याची वाट कार्यकर्ते पाहत होते. मागील ग्रामपंच्यातींच्या निवडणूकीत तळागाळातील कार्यकर्त्यामध्ये असलेल्या अबोळ्यामळे ग्रामपंच्याती हातातून निसटल्या होत्या. आता आगामी काळात युतीचे सरकार आणायचे असेल तर सर्वांनी एकत्रीत येणे गरचे असून त्यासाठी ग्रामपंचायत मुख्य आधार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

आमदार महेंद्र दळवी म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला एकमेकांतील मतभेद विसरून दिलजमाई करण गरजेचे आहे. राजकीय बदल करण्यासाठी ताकद महायुतीमध्ये आहे. आता बदल निश्चित आहे. रायगड जिल्ह्यात होणारे प्रकल्प रायगड जिल्ह्याला उंचावर नेवून ठेवेल. चौथा सागरी महामार्ग काही दिवसात होणार आहे. रायगड जिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचे असेल तर सर्वांनी एकत्रीत येवून निवडणुका लढविण्यासाठी कटिबध्द असणे गरजेचे आहे. मागील दिवसात काही झाले असेल ते विसरून नव्याने हातात हात घालून एकत्रीत येत जिल्ह्याचा विकास करू.

Web Title: Forget differences and work in coordination. Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.