माजी महापौर बेदी यांचे निधन

By admin | Published: November 2, 2014 01:11 AM2014-11-02T01:11:46+5:302014-11-02T01:11:46+5:30

मुंबई महानगरपालिकेचे पहिले शीख महापौर मनमोहन सिंग बेदी यांचे 3क् ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते 89 वर्षाचे होते.

Former Mayor Bedi dies | माजी महापौर बेदी यांचे निधन

माजी महापौर बेदी यांचे निधन

Next
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे पहिले शीख महापौर मनमोहन सिंग बेदी यांचे 3क् ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते 89 वर्षाचे होते.
1983-84 या कालावधीत बेदी यांनी महापालिकेचे महापौरपद भूषविले होते. कुलाबा येथील  ‘ए’ वॉर्डचे ते तब्बल 25 वर्षे नगरसेवक होते. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदीही ते कार्यरत होते. महापालिकेत असताना त्यांनी उद्यान समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता. 
 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत बेदी यांना आदरांजली वाहण्यासाठी सांताक्रुझ पश्चिम येथील गुरुद्वारा धन पोथोहर नगर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.  (प्रतिनिधी) 

 

Web Title: Former Mayor Bedi dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.