अलिबाग : देशाचे माजी नौदल प्रमुख एल. रामदास अलिबाग तालुक्यातील भायमाळा येथे फार्महाऊसवर आपल्या कुटुंबासमवेत राहतात. चक्र ीवादळामुळे फार्म हाऊसवरील पाण्याचे पंप नादुरु स्त झाले आणि वीज देखील गेल्यामुळे त्यांची गैरसोय झाली असल्याचे रायगड जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर खासदार राजीव सातव यांनी माहिती देताच पोयनाड पोलिसांनी तात्काळ त्यांची मदत करीत माणुसकीचा हात पुढे केला.
शनिवारी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर खासदार राजीव सातव यांनी देशाचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील भायमाळा या गावातील त्यांचे स्व:तच्या फार्महाऊसवर त्यांच्या पत्नी सोबत राहत आहेत. ३ जुन रोजी झालेल्या चक्र ीवादळामुळे त्यांचे फार्म हाऊसवर पाण्याचे पंप नादुरु स्त झाले होते. तसेच वीज देखील गेली होती. यामुळे रामदास कुटुंबियांची गैरसोय झाली असून ते अडचणीत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटला टॅग करावे : पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांचे संकल्पनेतुन चक्र ीवादळामुळे संपर्कतुटलेल्या व्यक्तींना असलेल्या अडचणी दूर करता याव्यात व त्यांचे नातेवाईकांपर्यंत त्यांची खुशाली कळावी म्हणून कनेक्टींग पीपल योजना सुरु करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये राहणा-या ज्या लोकांचा चक्र ीवादळा मुळे त्यांचे नातेवाईकांशी संपर्क तुटलेला आहे. त्या नातेवाईकांनी रायगड पोलीस या रायगड जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटला कनेक्टींग पीपला टँग करावे, असे अवाहन रायगड पोलिस दलामार्फत करण्यात आले आहे.