शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

गडसंवर्धन मोहीम प्रभावीपणे राबविणार, जयकुमार रावल यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 2:01 AM

संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन परिषदेत रावल बोलत होते.

महाड : संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन परिषदेत रावल बोलत होते. राज्यातील ४५० किल्ल्यांंवर राज्य शासनातर्फे शंभर दिवस स्थानिक जनतेच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात येईल, असेही रावल यांनी स्पष्ट केले.जोपर्यंत समाज जागृत होत नाही तोपर्यंत गडसंवर्धन करणे मोठे आव्हान आहे. गडसंवर्धन ही लोकचळवळ व्हायला हवी यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे सांगताना गड संवर्धनाखेरीज गाइड प्रशिक्षण, वृक्ष लागवड आदी उपक्र म राबवले जातील, असे रावल यांनी सांगितले.पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे सुशोभीकरण लवकरच केले जाईल, असे रावल यांनी जाहीर केले. रायगडची पुनर्बांधणी होऊ शकत नाही, मात्र या ऐतिहासिक बहुमोल ठेव्याचे जतन होऊ शकते. या गडावर आजही उत्खनन करताना शिवकालीन अवशेष सापडतात. रायगड विकासाच्या माध्यमातून रायगडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असेही खा. संभाजीराजे यांनी या वेळी स्पष्ट केले.जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे व माजी आमदार माणिक जगताप यांनी रायगड संवर्धन विकास योजना राबवताना परिसरातील २१ गावांच्या स्थानिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली.परिषदेला रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजीराजे, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, वन विभागाचे मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक विभागाचे सचिव भूषण गगराणी आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Jaykumar Rawalजयकुमार रावल