इतिहासातील शाैर्याची साक्ष देणाऱ्या अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची तटबंदी ढासळतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 01:04 AM2020-11-29T01:04:35+5:302020-11-29T07:10:59+5:30

मात्र हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने विशेष लक्ष दिले गेलेले नाही. दाेन महिन्यांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला.

The fortifications of Alibag's Colaba Fort are crumbling | इतिहासातील शाैर्याची साक्ष देणाऱ्या अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची तटबंदी ढासळतेय

इतिहासातील शाैर्याची साक्ष देणाऱ्या अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची तटबंदी ढासळतेय

googlenewsNext

रायगड : इतिहासातील शाैर्याची साक्ष देणाऱ्या अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याचे बुरूज आणि तटबंदी ढासळत आहे. मध्यंतरी करून निधीला मंजुरी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात निधी वर्ग झाला नसल्याने किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी २०२१ उजाडणार  आहे. 
कुलाबा किल्ल्यावरील पश्चिमेकडील तटबंदी आणि पूर्वेकडील बुरूज ढासळले आहेत. वेळीच डागडुजी केली गेली नाही, तर अखंड तटबंदी आणि बुरूज नामेशष हाेण्याची भीती शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने विशेष लक्ष दिले गेलेले नाही. दाेन महिन्यांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांना साेबत घेऊन त्यांनी सर्व्हेक्षण केले हाेते. तटबंदीची, बुरुजांची दुरुस्ती करतानाच काही नावीन्यपूर्ण बदल सुचविले हाेते. त्यावरही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केेले. यासाठी किती निधी लागणार आहे हे गुलदस्त्यात आहे. १२ नोव्हेंबरला मुंबई पुरातत्त्व विभागाने संबंधितांना पत्र पाठवून निधी लवकर वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगत त्यात पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांची सही आहे.

ऐतिहासिक महत्त्व

  • अलिबागच्या वैभवशाली परंपरेत कुलाबा किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
  • अरबी समद्रात असणारा हा किल्ला मिश्रदुर्ग श्रेणीतील आहे. छत्रपती शिवाजी महराजांनी अनेक गड-किल्ले जिंकले. त्यानंतर त्यांची डागडुजी  करून घेतली. 
  • सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांच्याकडे या किल्ल्याची धुरा हाेती. शेकडाे वर्षे झाली तरी शाैर्याची साक्ष देत आजही ताठ मानेने हा किल्ला उभा आहे.
     

कुलाबा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखाे पर्यटक येथे भेट देत असतात. तसेच किल्ल्यात सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे. दरवर्षी माघी गणेशाेत्सव साजरा केला जातो. १० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या मुख्य दरवाजापासून ते मंदिरापर्यंत दगडांचा पदपथ निर्माण केला हाेता. तसेच काही प्रमाणात सुशाेभीकरणही करण्यात आले हाेते. 

कुलाबा किल्ल्यासाठी केंद्रीय कार्यालयाने निधीला मंजुरी दिली आहे. लवकरच ती रक्कम वर्ग करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात हाेईल. - राजेंद्र यादव, अधीक्षक, पुरातत्त्व विभाग

दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली नाही, तर तटबंदी, बुरूज ढासळण्याची शक्यता आहे. निधी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप ताे वर्ग झालेला नाही. त्यामुळे डागडुजीसाठी जानेवारी २०२१ उजाडणार आहे.  - किशाेर अनुभवने , गडप्रेमी 

Web Title: The fortifications of Alibag's Colaba Fort are crumbling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.