चार अनंत गीते, तीन सुनील तटकरे यांच्यासह २६ उमेदवार रायगड लोकसभेच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:06 AM2019-04-05T06:06:37+5:302019-04-05T06:07:19+5:30

आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या २६ झाली आहे.

Four Anant Geete, three Sunil Tatkare and 26 candidates in the Raigad Lok Sabha elections | चार अनंत गीते, तीन सुनील तटकरे यांच्यासह २६ उमेदवार रायगड लोकसभेच्या रिंगणात

चार अनंत गीते, तीन सुनील तटकरे यांच्यासह २६ उमेदवार रायगड लोकसभेच्या रिंगणात

Next

अलिबाग : रायगडलोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केली. परिणामी, आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या २६ झाली आहे. शुक्रवार, ५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होऊन उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी जाहीर करणार आहेत.

शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरोधकांनी बुधवारी त्यांच्याशी नामसाधर्म्य असणाऱ्या ‘अनंत पद्मा गीते’ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर, गुरुवारी युतीचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांच्या सूचकांनी अनंत गंगाराम गीते (शिवसेना) यांचे आणखी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या दोघांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), संजय अर्जुन घाग (अपक्ष), विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्र ांती सेना), सचिन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी), गजेंद्र परशुराम तुरबाडकर (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष), गायकवाड अनिल बबन (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन भास्कर कोळी यांनी गुरुवारी आपला आणखी एक अर्ज दाखल केला आहे.
 

Web Title: Four Anant Geete, three Sunil Tatkare and 26 candidates in the Raigad Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.