शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 4:49 AM

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात येणार आहेत. शिवाय या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०१९ वर्षअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे व खड्डेमय रस्त्याच्या पाहणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल ते माणगाव दौरा केला. माणगाव येथील विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते, रायगडचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, आ. निरंजन डावखरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, तहसीलदार ऊर्मिला पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकणातील अतिवृष्टी, महामार्गावरून सुरू असलेली सततची अवजड वाहतूक आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे महामार्गाची दुर्दशा झाली आहे. महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे काम निधीअभावी रखडले होते. मात्र आता केंद्राकडून १० हजार कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने पनवेल ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा पत्रादेवीपर्यंतचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. महामार्गाचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले असून पनवेल ते इंदापूरपर्यंत दोन टप्पे करण्यात आले आहेत. महामार्गाला सिमेंट काँक्र ीटच्या रस्त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करणार असून १० ते १२ वर्षांत रस्त्यावर खड्डा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल, तरीही खड्डे पडले तर त्यास ठेकेदाराला जबाबदार धरले जाईल. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईतून कोकणात येतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्गावर सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.वाकण पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेशनागोठणे : महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पनवेल ते पोलादपूर दरम्यान वाकण नाका येथे काही काळ थांबले. जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याचे गरजेचे असल्याने त्यांनी पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करावी, असा आदेश संबंधित अधिकाºयांना दिला. पुलाच्या शेजारी नव्याने बांधकाम होत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच सध्या वापरात असलेला जुना पूल राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करावा असे निर्देशही दिले.आंबेत पुलाची दुरु स्ती येत्या दोन महिन्यात पूर्ण करणार असून त्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला पाटील यांनी मंजुरी दिली. हे काम राज्याच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाचे आयुष्यमान ५ वर्षांनी वाढणार आहे.आंबेत पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सदर पुलाचा प्रस्ताव राज्याने लवकरात लवकर सादर केल्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून प्रस्तावाला मंजुरी घेण्याचे अभिवचन खासदार अनंत गीते यांनी दिले. नवीन पूल येत्या दोन वर्षात पूर्ण करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलroad safetyरस्ते सुरक्षाMumbaiमुंबई