चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका
By admin | Published: October 12, 2015 04:51 AM2015-10-12T04:51:40+5:302015-10-12T04:51:40+5:30
तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि एका ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणूक २८ आॅक्टोबरला होणार आहे. ४६ जागांसाठी निवडणूक होत असून
कर्जत : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि एका ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणूक २८ आॅक्टोबरला होणार आहे. ४६ जागांसाठी निवडणूक होत असून, सर्व राजकीय पक्ष आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तयारीला लागले आहेत.
नोव्हेंबर २०१५ मध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. कडाव १३, वैजनाथ ९, दामत- भडवळ १३, भिवपुरी ९ या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तसेच हुमगाव ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. २८ आॅक्टोबरला मतदान होत असलेल्या या सर्व ग्रामपंचायतींसाठी नामांकन अर्ज भरण्यास सुरु वात झाली आहे. १३ आॅक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार असून, दाखल अर्जांची छाननी १४ आॅक्टोबरला त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. तर नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी १६ आॅक्टोबर ही तारीख असून, त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २८ आॅक्टोबरला मतदान झाल्यानंतर २९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती कर्जत तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे.
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत सर्व पक्षांनी महत्त्वाची केली आहे. तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.भिवपुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांची सत्ता आहे. वैजनाथमध्ये शिवसेना ताकद दाखविण्यासाठी सज्ज आहे. (वार्ताहर)