कार अपघातात चार जखमी
By Admin | Published: August 22, 2015 09:45 PM2015-08-22T21:45:51+5:302015-08-22T21:45:51+5:30
वाकण - खोपोली मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावर आठवड्यातून किमान एक ते दोन अपघात होत असल्याची नोंद पाली पोलीस
पाली : वाकण - खोपोली मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावर आठवड्यातून किमान एक ते दोन अपघात होत असल्याची नोंद पाली पोलीस ठाण्यातील माहितीवरून दिसून येत आहे.
शनिवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास स्कॉर्पिओ (एमएच०६ बीई४०४१) ही गाडी नागोठणे येथून पालीच्या दिशेला जात होती, तर इंडिगो कार (एमएच०६ एडब्ल्यू १६२०) ही खोपोलीकडून घाटाव येथे जात होती. यावेळी राबगांव गावाजवळ तामसोलीजवळ एका वळणावरती दोन्ही कारची धडक झाल्याने मोठा अपघात झाला. कल्पेश पिंपळे यांनी अपघाताची खबर पाली पोलीस ठाण्यात दिली. अपघातात स्कॉर्पिओ चालकासह तीन तर इंडिगोचालक असे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पाली पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.