दोन दुचाकींच्या धडकेत चार जखमी
By Admin | Published: November 3, 2015 12:45 AM2015-11-03T00:45:30+5:302015-11-03T00:45:30+5:30
लक्ष्मी आॅरगॅनिक्स कंपनीच्या युनिट नं. १ समोरील गेटवर महाड आसनपोई रस्त्यावर दोन पल्सर मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
बिरवाडी : लक्ष्मी आॅरगॅनिक्स कंपनीच्या युनिट नं. १ समोरील गेटवर महाड आसनपोई रस्त्यावर दोन पल्सर मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
रवी पडव्हान (२२) हे पल्सर मोटारसायकल (एमएच ०६ बीएल ७८४१) ने आपला मित्र रणजित खेडेकर याच्याबरोबर आसनपोईकडून महाड बाजूकडे जात असताना समोरून येणाऱ्या पल्सर मोटारसायकल (एमएच ०६ बीके ०१६४) वरील चालक अमोल वीर (२२,रा. ढालकाठी) याने जोरदार धडक दिल्याने त्याच्यापाठीमागे बसलेले सागर साळुंखे (२६, रा. पोलादपूर लोहारमाळ) असे चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. यातील जखमींना प्रथम महाड एमआयडीसीतील एमएमए रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता महाड शहरातील रानडे हॉस्पिटल व पुढील उपचाराकरिता मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मोटार अपघात म्हणून करण्यात आली आहे. या घटनेचा तपास प्रभारी अधिकारी नंदकिशोर सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. दाभाडे करीत आहेत. (वार्ताहर)