खंडाळा घाटात चार ओएफसी केबल जेसीबीने तोडल्या, बीएसएनएल इंटरनेट सेवा पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 07:05 PM2018-06-05T19:05:49+5:302018-06-05T19:19:19+5:30

अलिबाग- मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे दरम्यानच्या चार आॅप्टिकल फायबर केबल्स(ओएफसी) खंडाळा ते लोणावळ्यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील जेसीबीने खोदकामादरम्यान तोडल्या आहेत.

Four OFC cables were broken by JCB in Khandala Ghat, BSNL internet service jam | खंडाळा घाटात चार ओएफसी केबल जेसीबीने तोडल्या, बीएसएनएल इंटरनेट सेवा पूर्ववत

खंडाळा घाटात चार ओएफसी केबल जेसीबीने तोडल्या, बीएसएनएल इंटरनेट सेवा पूर्ववत

Next

- जयंत धुळप
अलिबाग- मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे दरम्यानच्या चार आॅप्टिकल फायबर केबल्स(ओएफसी) खंडाळा ते लोणावळ्यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील जेसीबीने खोदकामादरम्यान तोडल्या आहेत. पुणे-पनवेल ही संपूर्ण रायगड जिल्ह्यास इंटरनेट सेवा देणारी मुख्य व एकमेव ओएफसी केबल पूर्णपणे तुटली असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 100 टक्के ठप्प झाली आहे. परिणामी जिल्ह्यातीस सर्व सरकारी आॅनलाइन सेवा; बँकांच्या आॅनलाइन सेवा आणि एटीएम सेवा ठप्प झाल्याने जनसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे आॅनलाइन प्रवेश अर्ज दुपारपासून भरता येत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या दहावीचा निकाल आहे; तो तरी मिळणार का अशी चिंता पालक व विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. बीएसएनएल इंटरनेट 100टक्के बंद आणि त्याच वेळी खासगी कंपन्यांचे पूर्ण वेगात सुरू; या परिस्थितीमुळे जनसामान्य बीएसएनएलच्या कार्यप्रणालीबाबत शंका व्यक्त करीत आहेत. इतकी महत्त्वाची ओएफसी केबल जेथे आहे; तेथे खोदकाम होणार आहे; याची पूर्वकल्पना बीएसएनएलला देण्यात आली नव्हती का? दिली असल्यास त्या ठिकाणी बीएसएनएलचे जबाबदार अधिकारी उपस्थित होते का नव्हते; याची चौकशी तत्काळ करून दोषींवर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील जनसामान्यांना सांगावी, अशी संतप्त प्रतिक्रिया बीएसएनएल ग्राहक अनंत देवळे यांनी दिली आहे.

दरम्यान, खंडाळा घाटात ब्रेक झालेली ओएफसी जोडण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. लवकरच सेवा पूर्ववत सुरू होईल अशी माहिती रायगड बीएसएनएल चे महाव्यवस्थापक सी. व्ही. राव यांनी दिली आहे.

Web Title: Four OFC cables were broken by JCB in Khandala Ghat, BSNL internet service jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.