रायगड जिल्हा परिषदेमधील १२ सॅनिटायझर मशीनपैकी चार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:14 AM2020-08-20T01:14:22+5:302020-08-20T01:14:41+5:30

गंभीर बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालानातील सॅनिटायझर मशीन बंद असल्याचे दिसून आले.

Four out of 12 sanitizer machines in Raigad Zilla Parishad closed | रायगड जिल्हा परिषदेमधील १२ सॅनिटायझर मशीनपैकी चार बंद

रायगड जिल्हा परिषदेमधील १२ सॅनिटायझर मशीनपैकी चार बंद

Next

आविष्कार देसाई
रायगड : कोरोनाला अटकाव करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासनही मागे राहिलेले नाही, परंतु येथील शिवतीर्थ इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या १२ सॅनिटायझर मशीनपैकी ८ मशीन सुरू तर ४ मशीन बंद असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये समोर आले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालानातील सॅनिटायझर मशीन बंद असल्याचे दिसून आले.
रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी तब्बल २१ हजारांचा आकडा पार केला आहे. दररोज सरासरी ४०० रुग्ण सापडत आहेत, तर किमान १० रुग्णांचा मृत्यू होत आहे. १७ हजारांहून अधिक रुग्ण मृत्यूच्या दाढेतून परत येत आहेत. यामध्ये आरोग्य यंत्रणेचे मोठे श्रेय असल्याचे कोणालाच नाकारता येणार नाही. ग्रामीण विकासाचा गाडा ओढण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. केंद्र, राज्य, तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांच्या विकासासाठी विविध योजना आखण्यात येतात. त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. जिल्ह्यात १५ तालुके आहेत, तर एक पनवेल महानगरपालिका आणि किमान १० नगरपालिका आहे. महानगर, शहराचा भाग सोडला, तर उर्वरित ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारीही जिल्हा परिषदेवर आहे.
जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. कोरोनाचा धोका पाहता, अशा नागरिकांमार्फत कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये सुमारे १२ सॅनिटायझर मशीन लावल्या आहेत.
शिवतीर्थ इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले एक सॅनिटायझर मशीन सुरू होते. याच तळमजल्यावर समाजकल्याण सभापती, अर्थ व बांधकाम सभापती बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. बांधकाम विभागामध्ये सर्वाधिक नागरिक, ठेकेदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांची वर्दळ होती. प्रवेश करताना नागरिक सॅनिटायझरचा वापर करताना दिसून आले.
>कु ठल्या मशीन झाल्या बंद : पहिल्या मजल्यावर चार सॅनिटायझर मशीन आहेत, त्यातील तीन बंद तर, एक मशीन सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनातील आणि शेकापचे नेते आस्वाद पाटील यांच्या दालनाबाहेरील मशीन बंद दिसले, तसेच सामान्य प्रशासनातील मशीन बंद होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्या दालनातील मशीन सुरू असल्याचे दिसून आले. दुसºया मजल्यावर ग्रामपंचायत, कृषी विभाग, आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. तेथील तीनपैकी एक मशीन बंद होते, तर दोन सुरू होत्या. तिसºया मजल्यावर तीनपैकी एक मशीन बंद होते, तर दोन सुरू होत्या. चौथ्या मजल्यावरील मशीन सुरू होते.
>एकू ण किंमत ९,५०० रुपये
कोरोनाला अटाकाव करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सॅनिटायझर मशीन उपलब्ध करू दिल्या आहेत. त्यांची किंमत सुमारे नऊ हजार ५०० रुपये आहे. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात आले आहे. तेथील संबंधित विभागाने त्या मशीनमध्ये सॅनिटायझर भरणे गरजेचे आहे. तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत, असे बांधकाम विभागातून सांगण्यात आले.

Web Title: Four out of 12 sanitizer machines in Raigad Zilla Parishad closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.