कर्जत तालुक्यात चार जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:09 AM2020-07-18T00:09:20+5:302020-07-18T00:10:44+5:30
कर्जत नगरपरिषदेतील नगरसेवकाच्या ६३ वर्षीय आईचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कर्जत : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशे पार झाली आहे. शुक्रवारी त्यामध्ये आणखी चारने भर पडली आहे. बँक आॅफ इंडियाच्या तीन शाखेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने बँकेच्या तालुक्यातील तीन शाखा शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जत नगरपरिषदेतील नगरसेवकाच्या ६३ वर्षीय आईचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी एका कर्जत शहरात राहणाºया नगरसेवकाच्या आईचा आणि एका दहिवलीत राहणाºया नगरसेविकेच्या पतीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मुद्रे बुद्रुकमधील एका ७० वर्षांच्या वयस्कर व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. भिसेगावमधील एका ७५ वर्षांच्या महिलेचा तर नेरळ नजीकच्या भडवळ भागात राहणाºया एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
गेल्या दोन - तीन दिवसांत बँक आॅफ इंडियाच्या कडाव शाखेतील कॅशियर, कर्मचारी आणि शिपाई, जांभिवली शाखेचे अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बँक आॅफ इंडियाच्या कर्जत, कडाव व जांभिवली या तिन्ही शाखा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.