व-हाडाला झालेल्या अपघातात चार ठार,पोलादपूरजवळ पीकअप दरीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:00 AM2018-03-16T05:00:06+5:302018-03-16T05:00:06+5:30

साखरपुड्यासाठी फोपल्याचा मुरा येथे जात असताना चढावावर गाडीवरील नियंत्रण सुटून ती ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला

Four people were killed in a road accident and collapsed in peak valley near Poladpur | व-हाडाला झालेल्या अपघातात चार ठार,पोलादपूरजवळ पीकअप दरीत कोसळली

व-हाडाला झालेल्या अपघातात चार ठार,पोलादपूरजवळ पीकअप दरीत कोसळली

Next

पोलादपूर : साखरपुड्यासाठी फोपल्याचा मुरा येथे जात असताना चढावावर गाडीवरील नियंत्रण सुटून ती ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. वºहाडातील १६ जण जखमी झाले आहेत. यातील सात ते आठ जणांना उपचारासाठी महाड, माणगाव येथे पाठविण्यात असून काही जखमींना जवळच्या पोलादपूर ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले बुधवारी रात्री हा अपघात घडला.
या अपघातात भिकू तुकाराम मालुसरे (रा. अडावळे एरंडवाडी), पांडुरंग धोंडू बिरमणे (रा. अडावळे), अनिकेत अनंत सकपाळ (रा. पार्टेकोंड) हे तिघे जागीच ठार झाले तर जिजाबाई केशव पार्टे (रा. पार्टेकोंड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींमध्ये इंदूबाई रामचंद्र पार्टे (६५), वनिता बाळाराम पवार (५५), अरु णा सोनू सकपाळ, सुनीता सखाराम मांढरे, अशोक लक्ष्मण पार्टे, रेणुका भागुराम सकपाळ, कृष्णाबाई गणपत वाडकर, अंकिता सुरेश पार्टे (९), सुरेश लक्ष्मण पार्टे (४९), चिमाबाई बाळाराम वाडकर (६०), आकाश पार्टे, अमित सुरेश पार्टे (१५), राजेश्री तुकाराम सकपाळ (४५), प्रदीप रामचंद्र पार्टे (चालक), गणेश सयाजी पार्टे, ममता भिकाजी पार्टे, मनीषा अशोक पार्टे (सर्व रा. पार्टेकोंड) यांचा समावेश आहे.
अन्य जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
>मुरा येथे जात असताना चढावावर गाडीवरील नियंत्रण सुटून ती ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात चार जण ठार झाले असून मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जखमीवंर नजीकच्या रुग्णालात उपचार सुरू आहेत.

Web Title: Four people were killed in a road accident and collapsed in peak valley near Poladpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.