अश्वमेध यज्ञातील चार भोजनालये भक्तांच्या सेवेत; दररोज लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था
By वैभव गायकर | Published: February 24, 2024 04:50 PM2024-02-24T16:50:32+5:302024-02-24T16:50:52+5:30
चार वेगवेगळे भोजनालय याठिकाणी उभारण्यात आले असुन शांतिकुंज, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र अशी नावे या भोजनालयाला देण्यात आली आहेत.
पनवेल : खारघर मध्ये भव्य दिव्य अश्वमेध यज्ञाला दि.21 रोजी सुरुवात झाली आहे.देश विदेशातील व्हीआयपी या सोहळ्याला हजेरी लावत आहेत.अत्यंत नियोजनबद्ध या सोहळ्याला लाखो भक्तांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. चार वेगवेगळे भोजनालय याठिकाणी उभारण्यात आले असुन शांतिकुंज, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र अशी नावे या भोजनालयाला देण्यात आली आहेत.
अश्वमेध यज्ञ सोहळा आयोजित केलेल्या खारघर मधील हाईड पार्क मैदानात चार भोजनालय तयार करण्यात आले आहेत. या चार भोजनालयात गायत्री परिवाराचे विविध राज्यातील सदस्यांनी स्वतः अन्न धान्य सोबत आणून दररोज लाखो भक्तांना मोफत जेवण दिले जात आहेत. शुक्रवार दि.23 रोजी जवळपास 83 हजार भक्तांनी या चार भोजनालयात जेवण केले तर शनिवार दि.24 रोजी जवळपास दीड लाख भाविकांना याठिकाणी जेवण केले. गायत्री परिवाराचे सदस्य याबाबत सर्व नियोजन करत आहेत. भाविक देखील स्वतः या भोजनालयात सेवक म्हणुन देखील सहभागी होत आहेत. यामध्ये जेवल्यावर स्वतः या भोजनालयात धुनी भांड्याच्या कामात सहभागी होत आहेत. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तगण या सोहळ्यात सहभागी होत असल्याने भोजनालयात जेवणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती गायत्री परिवाराच्या सदस्य मीनल मित्तल यांनी दिली.
नियोजन बद्ध असे गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध सोहळ्याला मोठ्या संख्येने भक्तगण हजेरी लावत आहेत.या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तासाठी चार भोजनालये उभारली आहेत.या चारही भोजनालयात मोफत जेवण दिले जात आहे.1500 गायत्री परिवाराचे सदस्य याकरिता अहोरात्र मेहनत घेत आहेत. - मीनल मित्तल (गायत्री परिवार)