शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जागतिक विक्रमासाठी रायगडमधील चार विद्यार्थी सज्ज; रामेश्वरम येथून हाेणार १०० उपग्रहांचे प्रक्षेपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 5:54 AM

डॉक्टर पी. जे. अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत एकूण शंभर उपग्रह तयार करण्यात आले आहेत.

आविष्कार देसाईरायगड : तामिळनाडू येथील अंतराळ माेहिमेसाठी तब्बल एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. अभिमानाची बाब म्हणजे एक हजार विद्यार्थ्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चारपैकी तीन विद्यार्थी हे अलिबागचे आहेत. या माेहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स असे पाच रेकाॅर्ड नाेंदवले जाणार आहेत.

डॉक्टर पी. जे. अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत एकूण शंभर उपग्रह तयार करण्यात आले आहेत. ७ फेब्रुवारीला जागतिक विक्रम करण्यासाठी तामिळनाडू येथील रामेश्वरममध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमासाठी तीन बाल वैज्ञानिक हे अलिबागमधील आहेत. अवधूत वारगे (९ वी, आरसीएफ सेकंडरी स्कूल कुरूळ-अलिबाग), स्वरा पाटील ७ वी आणि केशवी सावंत इयत्ता ९ वी या दोघी अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या आहेत. विवेक काेळी  हा इयत्ता १० वीचा हा विद्यार्थी परळी, पाली-सुधागड शाळेचा विद्यार्थी आहे, अशी माहिती अलिबागमधील समन्वयक संदीप वारगे यांनी दिली.

जगात सर्वात कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम ) १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५००० ते ३८००० मीटर उंचीवर हाय अल्टीट्यूड सायंटिफिक बलूनद्वारे प्रस्थापित केले जाणार आहे. उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. या केससोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साइड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि अन्य माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला थेट पाठवतील. या पेलोडसोबत काही झाडांच्या बीजसुद्धा पाठवण्यात येत आहे. त्यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळणार आहे.महाराष्ट्रामध्ये मनीषा चौधरी महाराष्ट्र राज्य समन्वयक आहेत.

देशभरातील हजार विद्यार्थ्यांचा सहभागया अंतराळ मोहिमेसाठी देशभरातील हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तर, राज्यातील ३७५ विद्यार्थी सहभागी हाेत आहेत. त्यामध्ये पुणे आणि जळगावमधील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजी जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये याेगदान देता यावे, यासाठी खास महाराष्ट्रातील मुलांसाठी मराठीतून प्रशिक्षण दिल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी दिली.