डहाणू/ बोईसर : बोईसर खैरपाडा येथील सबस्टेशनमधील १३२ केव्ही या अतिउच्चदाबाच्या विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने गुरु वारी सायंकाळी साडेसात ते पहाटे साडेतीन या काळात बोईसर औद्योगिक वसाहतीतील काही भागासह जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि मोखाडा हे तालुके अंधारात होते.
येथील सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीकरिता किमान अडीच तासाचा अवधी लागू शकतो, ही शक्यता विचारात घेऊन एमएससीबीतर्फे ग्राहकांना या बाबतची माहिती देणारे एसएमएस पाठविण्यात आले. त्यानंतर साडेआठच्या सुमारास पंधरा ते वीस मिनिटांकरिता पुरवठा पुन्हा खंडीत झाला. त्यानंतर अकरा आणि एक वाजता पुरवठा सुरळीत होईल असे संदेश आले परंतु वीज आली नाही. उकाडा आणि डासांचा त्रास सहन करणाऱ्या ग्राहकांची उरली सुरली आशा हवेतच विरली. दरम्यान वीज कर्मचाऱ्यांच्या आठ तासांच्या प्रयत्नांना शुक्र वारी पहाटे साडेतीन वाजता यश आले. त्यानंतर काही तास चांगली झोप लागल्याची प्रतिक्रि या नागरिकांनी लोकमतशी बोलताना दिली. तर आठवड्यातून दर शुक्र वारी तांत्रिक कारणास्तव होणारा वीज पुरवठा खंडीत करण्यात न आल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका मिळाली.
सध्या वातावरणातील तापमान कक्षा वाढली असून उन्हाच्या काहिलीने लोकांच्या जीवाची लाही लाही होत असताना महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने डहाणूकर जनतेला विजेचा शॉक दिला आहे. गुरु वारी रात्री (दि.११) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यातील वीजपुरवठा अकस्मात खंडित करण्यात आला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु न केल्याने लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काळोख्या अंधारात व उकाड्यात जागूनच लोकांना रात्र काढावी लागली.
पावसाळ्यापूर्वीच महावितरणच्या या भोंगळ तमशामुळे तालुक्यात जनक्षोभ पसरला आहे. डहाणूच्या पश्चिम भागातील गाव पाड्यामध्ये उन्हाळ्यात महावितरण कंपनीकडून ३ ते ४ तास वीजपुरवठा खंडित केला जातो. या भागात समुद्रकिनारी दमट हवामान आढळते. त्यामुळे वातावरणात वाहती हवा थांबली की, प्रचंड उकाडा जाणवतो. रात्रभर वीज नसल्याने अनेकांना झोपमोड सहन करावी लागली. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात मोर्चा काढण्यात येईल, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील चिंचणी, वाणगाव, वरोर फिडर अंतर्गत पन्नास गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून वीजपुरवठा अनियमित आहे. त्यामुळे येथील लोकांच्या रोजगारावर त्याचा विपरीत परिणाम होत असून डायमेकिंग चा व्यवसाय कोलमडला आहे.नागरिक संतप्तडहाणूला वीजपुरवठा करणाºया बोईसर येथील १३२ के व्ही युनिटचे ब्रेक डाऊन झाल्याने गुरु वारी रात्री साडेसात वाजता वीजप्रवाह बंद झाला होता. महावितरण कंपनीने ग्राहकांना एसएमएस करून रात्री १ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल असा संदेश पाठविला. मात्र, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. दि.१२ रोजी सकाळी ८ वाजता वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील गावांमध्ये सुमारे १२ तास वीज नसल्याने नागरिक त्रस्त होते.