शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

चार हजार रुग्णांवर होत आहेत घरीच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 7:15 AM

रायगड जिल्ह्यात दिवसाला ७००हून अधिक रुग्ण सापडत आहेत. ११ सप्टेंबरच्या दिवशी ८३४ नवीन रुग्ण आढळले. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे, तसेच याच दिवशी २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ६८२ रुग्ण बरे झाले आहेत.

- आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २० हजार ९१२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सातत्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालये हाऊसफुल झाली असताना, तब्बल चार हजार रुग्णांवर घरीच उपचार होत आहेत. त्यामुळे विविध रुग्णालयांवरील ताण कमी होऊन आरोग्य यंत्रणेला मदत होत असल्याचे दिसते. मात्र, कमी लक्षणे असणाºया रुग्णांवरच घरी उपचार करण्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.रायगड जिल्ह्यात दिवसाला ७००हून अधिक रुग्ण सापडत आहेत. ११ सप्टेंबरच्या दिवशी ८३४ नवीन रुग्ण आढळले. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे, तसेच याच दिवशी २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ६८२ रुग्ण बरे झाले आहेत.अनलॉकनंतर जिल्ह्यात प्रवेश करताना कोणतीही तपासणी न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तो निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे उद्भवलेल्या परिस्थितीवरून दिसून येते. जिल्हाबंदी नसल्याने सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एक लाख २० हजार ९१२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ३५ हजार ४५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर २८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त आहेत. जिल्ह्यात ११ सप्टेंबरपर्यंत ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.वाढत्या रुग्णसंख्येमुळे विविध कोविड केअर सेंटर हाऊसफुल झाली आहेत. रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी कसरत करण्यापेक्षा घरातच उपचार घेण्यासाठी नागरिक तयार असल्याचे दिसून येते. आतापर्यंत चार हजार ११ रुग्णांवर घरातच उपचार केले जात आहेत. डॉक्टरांकडून त्यांची सातत्याने विचारपूस केली जात आहे. कोणताही त्रास होत असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कमी लक्षणे अथवा सौम्य लक्षणे असणाºया सर्वांनाच रुग्णालयात दाखल केले असते, तर रुग्णालयात उपचार करताच आले नसते.कोरोनाच्या सुरुवातीला रुग्णालयातच उपचार घेण्याला पसंती दिली जात होती. आता मात्र नागरिक घरीच उपचार घेणे पसंत करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. घरी उपचार घेताना विलगीकरणात राहावे लागत असले, तरी रुग्णांना घरात असल्याचे समाधान मिळते, तसेच काय हवे नको ते हे बघण्यासाठी घरातील नातेवाईक असतात. त्यामुळे इच्छाशक्ती प्रबळ होण्यास मदत मिळत असल्याचे घरात उपचार घेणारे अ‍ॅड. रत्नाकर पाटील यांनी सांगितले. रुग्णालयामध्ये गेल्यावर सर्वत्र रुग्ण बघून आणि तेथे उपलब्ध असणाºया सुविधांचा विचार करता, मी घरातच उपचार घेण्याला प्राधान्य दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र, ज्यांना श्वास घेण्यास जास्त त्रास होत असेल, त्यांनी रुग्णालयातच उपचार घेतले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची कमी लक्षणे आढळतात, तसेच त्यांना आरोग्याचा कमी त्रास होतो, त्यांच्यावर घरी उपचार करण्याला परवानगी आहे, परंतु श्वास घेण्याचा त्रास होणारे रुग्ण अथवा अन्य आजार असणाºया रुग्णांवर विविध कोविडच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.- डॉ. प्रमोद गवई,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, रायगडडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे. रुग्णालयात उपचार करताना रुग्णावर तेथील वातावरणाचा परिणाम होतो. साहजिकच दडपण येते. घरी उपचार घेणारा रुग्ण आशा परिस्थितीतून जात नाही, त्याला घरच्यांचा आधार मिळतो आणि मानसिकदृष्ट्या तो खंबीर होतो.- डॉ.अमोल भुसारे,मनोविकार तज्ज्ञविविध ठिकाणी उपचार घेणारे रुग्णकोविड केअर सेंटरमध्ये ४७९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत, तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १,०४९ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ३९० रुग्ण तर ४,०११ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस