चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन; प्रलंबित मागण्यांचं तहसिलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:30 AM2021-01-30T01:30:44+5:302021-01-30T01:30:55+5:30

राज्यव्यापी आंदोलनात नोंदविला सहभाग 

Fourth class employees wearing black ribbons; Statement of pending demands to tehsildar | चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन; प्रलंबित मागण्यांचं तहसिलदारांना निवेदन

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन; प्रलंबित मागण्यांचं तहसिलदारांना निवेदन

Next
ठळक मुद्दे विविध स्वरुपांच्या २५ मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या असून, त्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, आशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आगरदांडा :  प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, त्या पार्श्वभूमीवर मुरूड तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदवला. याबाबत तहसीलदार गमन गावीत यांना निवेदन देण्यात आले.

यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही मागण्या मान्य होत नसल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वर्ग ४ ची पदे निरसित करू नये, याबाबत १४ जानेवारी २०१६ चा शासनाचा २५ टक्के चतुर्थश्रेणी पदांच्या निरसित करण्याचा निर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खासगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्त्वावरील पदे त्वरित भरली जावी, राज्यातील वारसा हक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास त्वरित शासनसेवेत समाविष्ट करावे, सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी रिक्त पदे सरळसेवा भरतीने त्वरित भरावीत, बाह्य स्रोताद्वारे ती भरू नयेत, वेतन त्रुटीसंदर्भात खंड २ च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी. वर्षानुवर्षे कंत्राटाने काम करणाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, आकृतिबंधानुसार सरळसेवेत तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील ९२५ चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून शासन सेवेत कायम करावे, राज्य सरकारी विमा योजना, मंत्रालय उपहार गृहे, राज्य राखीव पोलीस बल, सार्वजनिक आरोग्य विभाग येथील चतुर्थश्रेणी पदे त्वरित भरण्यात यावीत, यासह विविध स्वरुपांच्या २५ मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या असून, त्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, आशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन
संदेश वाळंज, संजय तांबे, प्रेमनाथ पाटील, काशीनाथ पिरकट, धर्मा म्हात्रे, रजत वारगे, साईनाथ दिवेकर, संदीप मान , विकास गुरव, कृष्णा वारगे, रेखा बुल्लू आदींसह कर्मचारी उपस्थित होते. मागण्यांचे निवदेन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त) आदींनाही पाठवण्यात आले आहे.

Web Title: Fourth class employees wearing black ribbons; Statement of pending demands to tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.