चौथ्या बंदराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:01 AM2018-02-17T03:01:30+5:302018-02-17T03:01:42+5:30
जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. चौथ्या बंदराचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (१८फेब्रुवारी) मुंबई विमानतळाच्या पायाभरणीप्रसंगी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सेक्रेटरी गोपाळ कृष्णन यांनी दिली.
उरण : जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. चौथ्या बंदराचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (१८फेब्रुवारी) मुंबई विमानतळाच्या पायाभरणीप्रसंगी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सेक्रेटरी गोपाळ कृष्णन यांनी दिली.
जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमटी) चौथे बंदर आणि जेएनपीटी बंदराच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल आणि जेएनपीटीचे इतर अधिकारी उपस्थित होते. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या चौथ्या बंदरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण के ल्या आहेत. ७९१५ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याच्या कामावर ४७१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून चौथ्या बंदरातून २४ लाख कंटेनरची हाताळणी केली जाणार आहे.
चौथ्या बंदराच्या दुसºया टप्प्याचे काम २०२२ सालापर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर चौथ्या बंदरामुळे जेएनपीटी कंटेनर हाताळणीची क्षमता दुपटीने वाढणार आहे. जगातील अग्रेसर असलेले मर्क्स, सिंगापूर, दुबई पोर्ट आदी बंदरे जेएनपीटीत काम करीत असल्याने बंदरातून आता मौल्यवान सामान कुठल्याही देशात आयात-निर्यात करू शकतो. त्यामुळे लवकरच जेएनपीटी बंदर जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर पोहोचेल असा विश्वास केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सचिव गोपाळ कृष्णन यांनी व्यक्त केला.